Nawazuddin Siddiqui च्या पत्नीच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने आलियाला पाठवले समन्स
आलियाला 22 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरं तर, अभिनेता त्याची पत्नी आलियासोबतच्या घरगुती वादामुळे चर्चेत आहे. दोघांमधील वाद इतका वाढला आहे की हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले आहे. काही काळापूर्वी अभिनेत्याची आई मेहरुनिसा आणि आलिया यांच्यातील संपत्तीच्या वादाचे प्रकरण समोर आले होते. त्याचवेळी, आता न्यायालयाने नवाजुद्दीनची पत्नी आलियाला समन्स पाठवले आहे.
वास्तविक, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा यांनी आलियाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. या प्रकरणानंतर नवाजुद्दीनची पत्नी आलियाने पती आणि सासरच्यांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत अनेक तक्रारी दाखल केल्या. (हेही वाचा - Sidharth-Kiara Wedding Video: सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा आडवाणीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल; वरमाला घातल्यानंतर केलं एकमेकांना किस, पहा व्हिडिओ)
सध्या पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट नोंदवला आहे. मात्र, आलियाला कोर्टाने समन्स बजावले आहे. खरं तर, 2020 मध्ये, आलियाने तिच्या दिराविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. 2012 साली ती सासरी गेल्याचे तिने सांगितले होते.
या तक्रारीनंतर आलियाला एकदा कोर्टात हजर राहावे लागले होते, ज्यामध्ये तिने तिचे म्हणणे नोंदवले होते. मात्र, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर कोणत्याही प्रकारचा पुरावा न मिळाल्याने पोक्सो कोर्टाने क्लोजिंग रिपोर्ट दाखल केला होता. या प्रकरणी आलियाला न्यायालयात हजर राहण्यासाठी बोलावण्यात आले होते, मात्र ती हजर झाली नाही.
यानंतर, बुधवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली, मात्र, आलिया तेथे पोहोचली नाही. ADGC कुलदीप पुंडीर यांनी आलिया सतत कोर्टात हजर न राहिल्यामुळे समन्स पाठवले. आलियाला 22 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.