Nawazuddin Siddiqui's Wife Records Statement: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबाच्या संकटामध्ये वाढ होण्याची शक्यता; पत्नी आलिया सिद्दीकीने बुधना येथे नोंदवला आपला जबाब 

बॉलिवूड चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याच्या कुटुंबाच्या संकटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने (Aaliya Siddiqui) बुधना कोतवाली (Budhana Police Station) येथे तिचे निवेदन नोंदवले.

नवाजुदीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याच्या कुटुंबाच्या संकटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने (Aaliya Siddiqui) बुधना कोतवाली (Budhana Police Station) येथे तिचे निवेदन नोंदवले. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याचे तीन भाऊ आणि सासू यांच्याविरूद्ध आलिया सिद्दीकी यांनी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. घटन्स्थळ बुधना असल्याने, मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास मुझफ्फरनगरच्या एसएसपी कडे पाठवला. आता आलियाने बुधना येथे येऊन पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी देहरादून येथे असल्याची माहिती भाऊ फैजुद्दीन सिद्दीकीने दिली.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने गेल्या वर्षी 27 जुलै रोजी मुंबईच्या वर्सोवा स्थानकात एक रिपोर्ट दाखल केला होता. यामध्ये पती नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याचा भाऊ मिनाझुद्दीन, फैजुद्दीन, अयाजुद्दीन आणि सासू मेहरूनिशा इत्यादींवर गंभीर आरोप केले होते. आता आलियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ मिन्हाजुद्दीन सिद्दीकी यांनी 2012 मध्ये विनयभंगाचा प्रयत्न केला. विनयभंगाच्या घटनेबद्दल तिने आपल्या सासरच्या कुटुंबियांना माहिती दिली होती. परंतु हे प्रकरण घरच्या घरी मिटवण्याचा त्यांनी सल्ला दिला. (हेही वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी?)

लॉकडाऊनमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईहून मूळ जन्मस्थान बुधना येथे आले आहेत व सध्या ते इथेच राहत आहेत. दरम्यान, याआधी आलियाने लग्नानंतर 10 वर्षानंतर नवाजुद्दीन याला घटफोस्टाची नोटीस पाठवली होती. त्यामध्ये तिने स्वत:साठी जगण्यासाठी पैशांची सुद्धा मागणी केली आहे. त्याचसोबत आलिया हिचे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर सुरु असल्याचे तिच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. नवाज आपल्याला आणि मुलांना वेळ देत नाही तसेच त्याची घरातील वागणूक ही अपमानास्पद असते,त्यामुळे त्याच्यापासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे असेही तिने सांगितले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now