National Film Awards: दिल्लीत पार पडला 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा; Alia Bhatt, Kriti Sanon ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर Allu Arjun सर्वोत्कृष्ट अभिनेता, जाणून घ्या संपूर्ण यादी (See Full List)
काश्मिर फाइल्सला नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी 2021 या वर्षासाठीचे पुरस्कार दिले जात आहेत.
यंदाचा 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (69th National Film Awards) सोहळा आज (मंगळवार) दिल्लीत पार पडला. याआधी 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी आणि अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीत आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 17 ऑक्टोबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे दुपारी 1:30 वाजता सुरू झाला. भारताच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार विजेत्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी पुरस्कारांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली होती. फिचर, नॉन-फीचर आणि सिनेमातील सर्वोत्कृष्ट लेखन. यामध्ये ‘एक दुआ' सर्वोत्कृष्ट नॉन फीचर चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, आर माधवनच्या रॉकेट्री द नंबी इफेक्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला, तर शूजित सरकारच्या सरदार उधमला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. काश्मिर फाइल्सला नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी 2021 या वर्षासाठीचे पुरस्कार दिले जात आहेत. (हेही वाचा: Vishnudas Bhave Gaurav Padak: प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर)
पहा विजेत्यांची संपूर्ण यादी-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (आर माधवन लीड हीरो)
उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: आरआरआर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन (गोदावरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ): शाही कबीर, नायट्टू
सर्वोत्कृष्ट पटकथा (रूपांतरित): संजय लीला भन्साळी आणि उत्कर्षिणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: उत्कर्षिणी वशिष्ठ आणि प्रकाश कपाडिया (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गाणी): देवी श्री प्रसाद (पुष्पा)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (पार्श्वसंगीत): एमएम कीरावानी (आरआरआर)
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर- वीरा कपूर (सरदार उधम सिंग)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर- सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- अविक मुखोपाध्याय, सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट संपादन- संजय लीला भन्साळी (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट- प्रीतीशील सिंग (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट-चेल्लो शो
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- होम
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट- काडैसी विवसयी
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट- उपेना
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- एकदा काय झाला
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: कलकोक्खो
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: अनुर
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट: प्रतिक्षा
सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: अनुनाद - द रेझोनन्स
पर्यावरण संवर्धन/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: आवसाव्युहम्
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: गांधी आणि कं.
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - भावीन रबारी (चेल्लो शो)
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- 777 चार्ली
विशेष ज्युरी पुरस्कार- शेरशाह, विष्णूवर्धन
सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफर- आरआरआर (किंग सोलोमन)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- आरआरआर (प्रेम रक्षित)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर (व्ही श्रीनिवास मोहन)
सर्वोत्कृष्ट नॅरेशन व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट- कुलदा कुमार भट्टाचार्जी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- इशान दिवेचा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: काला भैरव, आरआरआर
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : श्रेया घोषाल, इरावीन निझाल