Naga Chaitanya Sobhita Dhulipala Got Engaged: नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी केला साखरपुडा; नागार्जुन यांनी फोटो शेअर करत दिले आशीर्वाद

नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी एक्सवर फोटो पोस्ट करून मुलाच्या साखरपुड्याची माहिती दिली. त्यांच्या हैदराबादमधील घरीच साखरपुड्याचा समारंभ पार पडला.

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Got Engaged: नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी केला साखरपुडा; नागार्जुन यांनी फोटो शेअर करत दिले आशीर्वाद

दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला ( Sobhita Dhulipala) यांचा साखरपुडा पार (Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement ) पडला आहे. हा साखरपुडा नागार्जुन यांच्या घरी पार पडला. नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या सोबतच नागार्जुन यांनी एक नोट लिहली आहे.  फोटो शेअर करताना नागार्जुन यांनी म्हटले की, आम्हाला आमचा मुलगा, नागा चैतन्य, शोभिता धुलीपाला यांचा आज सकाळी 9.42 वाजता साखरपुडा झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (हेही वाचा - Phulwanti Movie: प्राजक्ता माळीने वाढदिवशी केली मोठी घोषणा; 'फुलवंती' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर)

पाहा पोस्ट -

नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी एक्सवर फोटो पोस्ट करून मुलाच्या साखरपुड्याची माहिती दिली. त्यांच्या हैदराबादमधील घरीच साखरपुड्याचा समारंभ पार पडला. नागार्जुन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोभिता व नागा चैतन्य दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोंवर कमेंट करून चाहते चैतन्य व सोभिताला शुभेच्छा देत आहेत. चैतन्य व सोभिता काही वर्षांपासून डेटिंग करत होते.

2015 मध्ये, शोभिताने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे केली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी शोभिताला नामांकनही मिळाले होते. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा शो 'मेड इन हेवन'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2024 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).