Murder Film Controversy: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा विरुद्ध गुन्हा दाखल

वर्मा यांनी 21 जूनला एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले होते की, फादर्स डे निमित्त मी एक चित्रपट तयार करत आहे. त्याचा पहिला लूक लॉन्च करत आहे. हा चित्रपट अमृता आणि त्याच्या प्रेयसीचे वडील मारुती राव यांच्या कहाणीवर आधारीत आहे.

Ram Gopal Varma | (Photo Credits: Facebook)

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या आगामी 'मर्डर' (Murder Film) चित्रपटासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि चित्रपट निर्माता नट्टी करुणा यांच्या विरोधात नलगोंडा पोलिसांनी (Nalgonda Police) मिरयालागुडा टाऊन - पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध तेलंगाना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरुन गुन्हा दाखल केला आहे. वर्मा आणि निर्माता नट्टी करुणा यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 153 आणि एससी/एसटी (अत्याचार निवारण) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पी. बालास्वामी या याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेवरुन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पी. बालास्वामी यांचा मुलगा प्रणय कुमार याची 2018 मध्ये त्याचा सासरा मारुती राव याने हत्या केली होती. दलित असलेल्या प्रयण कुमार याने उच्चवर्णीय मारुती राव याच्या मुलीसोबत लग्न केले. या रागातून मारुती राव याने प्रणय याची हत्या केल्याचे हे प्रकरण आहे. बालस्वामी यांनी गेल्या महिन्यात न्यायालयाचा दरवाचा ठोठावत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ही मागणी करताना त्यांनी म्हटले आहे की, प्रणय आणि त्यांची सून अमृता यांची छायाचित्र त्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता चित्रपटात वापरली गेली आहेत.

दलित समुदायातील प्रणय (वय 24) याची 14 सप्टेंबर 2018 मध्ये मिरयालागुडा येथे दिवसाढवळ्या भाडोत्री मारेकऱ्यांकरवी हत्या केली होती. आपली आई आणि पत्नीसोबत खासगी रुग्णालयातून बाहेर येत असताना ही हत्या केली होती. हत्येची घटना सीटीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणात उच्चवर्णीय मारुती राव आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. प्रणय याची हत्या करण्यासाठी राव याने मारेकऱ्यांना एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. पुढे त्याने मार्च 2020 मध्ये हैदराबाद येथे आत्महत्या केली. (हेही वाचा, XXX स्टार मिया मालकोवा हिच्या क्लायमेक्स चित्रपटाच्या बोल्ड ट्रेलरने इंटरनेटवर लावली आग; 24 तासात साढे तीन लाख लोकांनी पाहिला)

दरम्यान, रामगोपाल वर्मा यांनी गेल्याच महिन्यात घोषणा केली होती की, ते मारुती राव आणि त्यांच्या मुलीवर एक चित्रपट काढणार आहेत. वर्मा यांनी 21 जूनला एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले होते की, फादर्स डे निमित्त मी एक चित्रपट तयार करत आहे. त्याचा पहिला लूक लॉन्च करत आहे. हा चित्रपट अमृता आणि त्याच्या प्रेयसीचे वडील मारुती राव यांच्या कहाणीवर आधारीत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif