IPL Auction 2025 Live

Mirzapur 2 ला पायरसीचे ग्रहण? सुपरहिट वेबसिरीजचे सर्व एपिसोड्स Telegram आणि TamilRockers वर लीक

अली फजल, दिव्येंदू शर्मा, विक्रांत मस्से, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी आणि श्रिया पिळगावकर यांच्या अभिनयाने नटलेली वेबसिरीज सुपरहिट ठरली.

Mirzapur 2 gets leaked online (Photo Credits: Instagram)

मोठ्या प्रतिक्षेनंतर वेबसिरीज मिर्झापूरचा सीजन 2 (Mirzapur 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अली फजल, दिव्येंदू शर्मा, विक्रांत मस्से, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी आणि श्रिया पिळगावकर यांच्या अभिनयाने नटलेली वेबसिरीज सुपरहिट ठरली. बहुप्रतिक्षित असलेला सीजन 2 रिलीज झाल्याने प्रेक्षकवर्ग आनंदून गेला आहे. परंतु, या वेबसिरीजला लीक होण्याची भीती खरी ठरली आहे. सुपरहिट वेबसिरीजला देखील पायरसीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मिर्झापूर 2 आता फ्री डाऊनलोडसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे सर्च इंजिन्सवर Mirzapur 2 Movie Full Series Available, Mirzapur 2 episodes  download on Filmyzilla, Mirzapur 2 TamilRockers download या किवर्ड्सने भरुन गेला आहे. मिर्झापूरचे सर्व एपिसोड्स 1080p HD, 480p, 720p त्याचबरोबर cam-rip व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या मिर्झापूर 2 सध्या हिट असून या सीजनला प्रेक्षकांचे अधिक प्रेम आणि प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. सध्या मिर्झापूर 2 चे सर्व एपिसोड्स प्राईमवर 22 ऑक्टोबर रोजी रिलीज झाले. अवघ्या 24 तासांत ते टॉरन्टच्या वेगवेगळ्या साईट्सवर उपलब्ध आहेत. हे एपिसोड्स डाऊनलोड करण्यासाठी वेगवेगळे किवर्ड्स वापरले जात आहेत. Mirzapur 2 Full Series Download, Mirzapur 2 Full Series Tamilrockers, Mirzapur 2  Full Series Tamilrockers HD Download, Mirzapur 2  Full Series Download Tamilrockers, Mirzapur 2  Full Series Telegram, Mirzapur 2 Telegram links, Mirzapur 2 Full Series HD Telegram यांसारखे किवर्ड्स वापरून एपिसोड्स डाऊनलोड केले जात आहेत. (Boycott Mirzapur 2 च्या ट्रेंडवर मुन्ना त्रिपाठी ऊर्फ दिव्येंदु शर्मा ने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'हा मूर्खपणा आहे')

पायरसीमुळे होणारे मोठे नुकसान लक्षात घेत देशातील पायरसीला आळा घालण्याचे शर्थीचे प्रयत्न निर्माते आणि चित्रपटसृष्टीकडून केले जात आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही पायरेटेट व्हर्जन पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र हे चुकीचे असल्याने याबद्दलची सजगता वाढवून हे रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.