#MeToo Movement: तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनतर गणेश आचार्य यांची पहिलीच प्रतिक्रिया
ज्याचा मी उल्लेख करणार नाही. आम्ही महिला आयोगालाही पत्र दिले आहे. माझ्याही घरी आई, बहीण, मुलगी आहे. ज्या पद्धतीने देशात स्वच्छ भारत अभियान चालले त्याच पद्धतीने बॉलिवुडमध्ये #MeToo अभियान चालले. या अभियानामुळे अनेक वाईट गोष्टी पुढे आल्या.
#MeToo मोहिमेखाली झालेल्या आरोपांवर मौन बाळगलेले कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी अखेर आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले आहे. अभिनेत्री तनूश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने #MeToo मोहिमेखाली अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक शोषणाचे सनसनाटी आरोप करुन बॉलिवुडसह सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. आरोपांच्या या भोवऱ्यात तिने गणेश आचार्य यांनाही ओढल्याने या प्रकरणात आचार्य यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, या सर्व आरपांवर आचार्य यांनी प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र, आता त्यांनी पहिल्यांदाच या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #MeToo मोहिमेखाली केलेल्या आरोपांना उत्तर देताना गणेश आचार्य यांनी म्हटले आहे की, मी सत्याच्या सोबत आहे. मी असत्यासोबत नाही. #MeToo मोहिमेमुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत. पण, ज्या गोष्टी खोट्या पद्धतीने बाहेर आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ज्या पद्धतीने तनुश्रीने आमच्यावर केलेला आरोप होता तो पूर्णपणे चुकीचा होता.
गणेश आचार्य यांनी पुढे म्हटले की, आमच्याबद्दल तनुश्रीने अनेक शब्द वापरले आहेत. ज्याचा मी उल्लेख करणार नाही. आम्ही महिला आयोगालाही पत्र दिले आहे. माझ्याही घरी आई, बहीण, मुलगी आहे. ज्या पद्धतीने देशात स्वच्छ भारत अभियान चालले त्याच पद्धतीने बॉलिवुडमध्ये #MeToo अभियान चालले. या अभियानामुळे अनेक वाईट गोष्टी पुढे आल्या. (हेही वाचा, #MeToo मुळे सुशिक्षित महिलांच्या नोकरीवर गंडांतर: शिवसेना आमदार शिरसाट)
दरम्यान, तनुश्री दत्ता हिने 2018मध्ये #MeToo मोहिमेखाली आरोप केले होते की, अभिनेता नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिच्यावर सेक्शुअली हॅरॅशमेंट केली. त्यानंतर या आरोपांची इतकी चर्चा झाली की, थेट नाना पाटेकर यांनाही प्रश्न विचारण्यात आले. या आरपांमध्ये गणेश आचार्य यांनाही ओढत तनुश्रीने म्हटले होते की, नानाने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना सांगून गाण्यात जाणीवपूर्वक इंटीमेट स्टेप्स ठेवल्या होत्या. या प्रकाराला विरोध केल्यावर नाना पाटेकर यांनी तिला धमकी देण्यासाठी सेटवर गुंड बोलावले होते, असाही आरोप तनुश्रीने केला आहे.