Mere Liye Tum Kaafi Ho Song in Shubh Mangal Zyada Saavdhan: आयुष्मान खुराना याच्या आवाजातील समलैंगिक प्रेमाचा एक वेगळा पैलू अगदी हळूवारपणे मांडणारे शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटातील 'हे' गाणे; Watch Video
या गाण्यामध्ये आयुष्मान खुरानाच्या नाकात नोझ रिंग दिसत आहे आणि त्याच्या अदा थोड्या मुलीसारख्या दिसत आहे.
बॉलिवूड मध्ये याआधीही समलिंगी विषयावर अनेक चित्रपट आले मात्र ते बॉक्स ऑफिस फारसे चालले नाही. त्यातल्या त्यात अभिषेक-जॉन अब्राहम चा 'दोस्ताना' (Dostana) हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर बराच चालला. मात्र त्याचे श्रेय केवळ दोघांना जात नसून त्यातली अभिनेत्री प्रियंका चोपड़ा लाही जातो. त्यामुळे पुन्हा थोडे खोडकर आणि मनोरंजक पद्धतीने हा विषय तुमच्यासमोर आणण्यासाठी दिग्दर्शक हितेश केवल्या तयारीत आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' (Shubh Mangal Jyada Savdhan) या चित्रपटातून हा विषय तुमच्यासमोर घेऊन येत आहे अभिनेता आयुष्मान खुराना. नुकतेच या चित्रप (Ayushmann Khurrana) टातील 'मेरे लिए तुम काफी हो' हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
Shubh Mangal Zyada SaavdhanWatch Video:
हेदेखील वाचा- 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मान खुराना सोबत रोमांन्स करताना दिसणार राजकुमार राव?
हे गाणे आयुष्मान खुराना याने गायिले असून वायु यांनी हे गाणे लिहिले आहे. या चित्रपटात आयुष्मानसह जितू के प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात आयुष्मान खुराना चक्क राजकुमार राव (Rajkummar Rao) सोबत रोमांस करताना दिसणार अशी चर्चा कानावर येत होती. राजकुमार राव आणि आयुष्मान ने याआधी 'बरेली की बर्फी' या चित्रपटात एकत्र काम केले होते.