Manoj Bajpayee Tested COVID-19 Postive: कोरोना करतोय बॉलिवूडकरांचा पाठलाग! रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी पाठोपाठ मनोज वाजपेयीला देखील कोरोनाची लागण

काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूर कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याची माहिती मिळाली होती. त्यापाठोपाठ आता मनोज वाजपेयी देखील कोविड पॉजिटिव्ह आढळले आहेत.

Manoj Bajpayee (Photo Credits: FB)

सामान्य नागरिकांसह बॉलिवूडकरांनाही कोरोना व्हायरसने पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कानावर येते न येते तोच आता अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याला कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याची माहिती मिळत आहे. मनोज वाजपेयी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना होम क्वारंटाईन (Home Quarantine) करण्यात आले आहे अशी माहिती त्यांच्या टीमने दिली आहे. मनोज वाजपेयी यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्याने तो करत असलेल्या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूर कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याची माहिती मिळाली होती. त्यापाठोपाठ आता मनोज वाजपेयी देखील कोविड पॉजिटिव्ह आढळले आहेत.हेदेखील वाचा- Sanjay Leela Bhansali Tests Positive for COVID-19: संजय लीला भन्साळी यांना कोरोना विषाणूची लागण; Gangubai Kathiawadi चे शुटींग थांबले

मनोज वाजपेयी सध्या 'डिस्पॅच्ड' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर त्याचा 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती, त्यानंतर आता चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या प्रकृतीविषयी बातमी समोर आली. भन्साळी सध्या त्यांच्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement