Mamta Kulkarni Takes Sanyaas At Mahakumbh: ममता कुलकर्णी बनली संन्यासी; गळ्यात रुद्राक्ष आणि भगवे कपडे परिधान करून पोहोचली महाकुंभ मेळ्यात (Watch Video)

बॉलीवूड अभिनेत्री शुक्रवारी सकाळी महाकुंभातील किन्नर आखाड्यात पोहोचली जिथे तिने किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Acharya Mahamandaleshwar Dr Lakshmi Narayan Tripathi) यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. दोघींमध्ये सुमारे एक तास महामंडलेश्वर होण्याबाबत चर्चा झाली.

Mamta Kulkarni Takes Sanyaas (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Mamta Kulkarni Takes Sanyaas At Mahakumbh: 90 च्या दशकात बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव असलेल्या ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) अधिकृतपणे 'संन्यास' घेतल्यानंतर आता ती साध्वी झाली आहे. बॉलीवूड अभिनेत्री शुक्रवारी सकाळी महाकुंभातील किन्नर आखाड्यात पोहोचली जिथे तिने किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Acharya Mahamandaleshwar Dr Lakshmi Narayan Tripathi) यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. दोघींमध्ये सुमारे एक तास महामंडलेश्वर होण्याबाबत चर्चा झाली. तिने गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि खांद्यावर भगव्या रंगाची पिशवी घेतलेली दिसली. ममताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती हिंदू भिक्षूसारखी भगव्या रंगाच्या वस्त्रात दिसली. तिचे नवीन नाव श्री यमाई ममता नंदगिरी आहे.

शुक्रवारी महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी ममता कुलकर्णी यांच्यासोबत अखिल भारतीय आखाड्याचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांच्याकडे गेले. भेटीदरम्यान ममता यांनी धर्माबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी असेही सांगितले की जेव्हा भगवान राम माता सीतेच्या शोधात चित्रकूटच्या जंगलात गेले होते तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात संवाद झाला होता. किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी यांची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्याबाबत पूर्ण गुप्तता पाळली आहे. (हेही वाचा -Viral Girl Monalisa: कुंभमेळ्यात हार विकणाऱ्या मुलीला मिळाली चित्रपटाची ऑफर; हा दिग्दर्शक बनवणार सिनेमा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mamta Kulkarni 🔵 (@mamtakulkarniofficial____)

महाकुंभात येणे आणि त्याची भव्यता पाहणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. महाकुंभाच्या या पवित्र वेळेची मी देखील साक्षीदार आहे हे माझे भाग्य असेल,' असं ममता कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी म्हटलं आहे की, 'किन्नर आखाडा ममता कुलकर्णी (माजी बॉलिवूड अभिनेत्री) यांना महामंडलेश्वर बनवणार आहे. त्यांचे नाव श्री यमाई ममता नंदगिरी ठेवण्यात आले आहे. मी येथे बोलत असताना, सर्व विधी सुरू आहेत. ती गेल्या दीड वर्षांपासून किन्नर आखाडा आणि माझ्या संपर्कात आहे.' (हेही वाचा  -  Monalisa Bhosle: कोण आहे मोनालिसा भोसले? हा चेहरा का खेचतोय महाकुंभ मेळ्यातील गर्दी?)

दरम्यान 2015 मध्ये लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केला. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी त्यांच्या टीमसह ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात जोडण्यास किन्नर आखाड्याची सुरुवात केली. समाजातील 'किन्नरांना' आदर देणे हा यामागील उद्देश होता. तथापी, सध्या सोशल मीडियावर ममता कुलकर्णीचे महाकुंभमधील फोटोज आणि व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत आहेत. ममता कुलकर्णीने करण अर्जुन, क्रांतीवीर, सबसे बडा खिलाडी यासह अनेक सुपरहिट बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेला 'कभी तुम कभी हम' हा तिचा शेवटचा हिंदी चित्रपट होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now