हॉटनेसचा तडका मारलेल्या कैटरीना कैफ च्या फोटोज नी नेटक-यांची उडविली झोप
Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड हॉट आणि मादक अभिनेत्री म्हणून जिचे नाव आर्वजून घेतले जाते ती म्हणजे कैटरीना कैफ (Katrina Kaif). ज्याप्रमाणे चित्रपटात आपल्याला तिच्या हॉटनेसची झलक पाहायला मिळते त्याप्रमाणे ती सोशल मिडियावरही आपल्या हॉट फोटोजने आपल्या चाहत्यांना वेडं लावत आहे. नुकतेच तिने आपल्या सोशल अकाउंटवरून आपले एकाहून एक सरस असे सेक्सी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच सोशल मिडियावर ते व्हायरल झाले असून आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांनी ते लाइक केले आहेत.

कैटरीना ने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स घातले आहेत. आपल्या इन्स्टा अकाउंटवर हे फोटो शेअर करताना चाहत्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.

 

View this post on Instagram

 

Something exciting coming soon

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

अलीकडेच कैटरीना ने सलमान खान सह 'भारत' या चित्रपटात काम केले होते. त्यातील तिचा साडीतला लूक आणि कुरळ्या केसांची हेअरस्टाईल देखील तिच्या चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरली होती.

हेही वाचा - 'भारत' सिनेमातील कतरिना कैफ हिचा लूक आऊट (Photo)

आता लवकरच तर अभिनेता अक्षय कुमार सह 'सूर्यवंशी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी याने केले आहे. हा चित्रपट 27 मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होईल.