IPL Auction 2025 Live

विनोदी अभिनेते Bullet Prakash यांचे निधन; वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी चटका लावणारी एक्झिट

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बुलेट प्रकाश यांच्या शारीरातील अनेक अवयवांनी काम करणे थांबवले होते. ज्यामुळे त्यांचे निधन झाले.

Bullet Prakash (Photo Credits: Twitter)

कन्नड (Kannada) चित्रपटसृष्टीतील नामवंत कॉमेडियन (Comedian) बुलेट प्रकाश (Bullet Prakash) यांचे निधन झाले आहे. ते अवघ्या 44 वर्षांचे होते. बंगळुरु (Bengaluru) येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यकृताच्या विकारामुळे गेले काही दिवस ते त्रस्त होते. त्यामुळे त्यांना बंगळुरु येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. अखेर त्यांचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी वजन कमी करण्यासाठी स्वत:वर शस्त्रक्रिया करुन घेतल्याचेही सांगितले जात आहे.

बुलेट प्रकाश यांच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बुलेट प्रकाश हे 44 वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बुलेट प्रकाश यांच्या शारीरातील अनेक अवयवांनी काम करणे थांबवले होते. ज्यामुळे त्यांचे निधन झाले.

बुलेट प्रकाश हे कन्नड सिनेसृष्टीत एक अत्यंत लोकप्रिय नाव आहे. सँडलवूड हा त्यांचा सर्वात पहिला आणि गाजलेला विनोदी चित्रपट. या चित्रपटातून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. प्रकाश यांनी आतापर्यंत सुमारे 350 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते मधल्या काही काळात भारतीय जनता पक्षासोबतही जोडले गेले होते. कन्नड सिनेमात बुलेट प्रकाश केवळ कॉमेडीच नव्हे तर अभियनामुळेही खास लोकप्रिय होते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बुलेटे प्रकाश यांच्या शरीरात 5 एप्रिल रोजी सकळी यकृत इन्फेक्शन आणि गॅस्ट्रीकची समस्या निर्माण झाली. रुग्णालयात त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्याचा त्यांना जीवदान मिळण्यासाठी फायदा होऊ शकला नाही. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा, 'हल्दीराम भुजियावाला'चे मालक महेश अग्रवाल यांचे सिंगापूर येथे निधन; कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे कुटुंब तिकडेच अडकले)

दरम्यान, बुलेट प्रकाश यांनी पाच महिन्यांपूर्वीच आपल्यावर शस्त्रक्रिया करुन घेतली होती. या शस्त्रक्रियेने त्यांनी आपले वजन 35 किलोंनी घटवले होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रचंड परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.