मुलाला नकार दिल्याने Kangana Ranaut च्या बहिणीवर झाला होता ऍसिड अटॅक; 54 सर्जरी नंतरही जखमा तशाच

कंगना रनौतची (Kangana Ranaut) बहीण रंगोली (Rangoli Chandel) कायमच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियाचा वापर करून ती नेहमीच अनेक मुद्द्यांवर तिची मतं मांडते, तसेच बहिणीच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट्स लिहिते. पण यावेळी मात्र तिने शेअर केलेली पोस्ट पाहून तुम्हालाही नक्कीच वेदना  होतील.

रंगोलीने सोशल मीडियावर आधी तिच्या कॉलेज जीवनातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर ती लिहिते, मी शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोवर प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेकांनी मला कॉलेजमधील माझा फोटो शेअर करण्यास सांगितला होता. मी सायन्सची विद्यार्थिनी असल्याने कॉलेजच्या दिवसात मला फोटो काढायला देखील वेळ नसायचा. पण ऍन्युअल डेला काढलेला हा एकमेव फोटो.

कॉलेजमधील फोटो शेअर केल्यावर काहीच वेळात तिने दुसरा फोटो शेअर केला. पण हा फोटो पोस्ट करताना मात्र ती लिहिते की कॉलेजमधील फोटो काढल्यावर लगेचच मला एका मुलाने प्रोपोज केलं होतं.

परंतु मी नकार दिल्याने म्हणून त्याने एक लिटर ऍसिड माझ्या चेहऱ्यावर ओतले. आणि गेल्या ५ वर्षात माझ्यावर 54 सर्जरी झाल्या असूनदेखील डॉक्टर माझा कान व्यवस्थित करू शकले नाहीत. या घटनेमुळे मी माझा एक डोळा गमावला. रंगोलीच्या या फोटोवर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.