Kartik Aaryan आणि Karan Johar यांच्यातील वादात Kangana Ranaut ची उडी; पहा काय म्हणाली

अशी माहिती विविध मीडिया माध्यमातून वेगाने पसरली. त्यात आता बॉलिवूड क्विन कंगना रनौत हिने उडी घेतली आहे.

Kartik Aaryan, Karan Johar & Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि निर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांच्यात जोरदार वाद झाला असून 'दोस्ताना 2' (Dostana 2) सिनेमातून करणने कार्तिकला बाहेर केले आहे. तसंच त्याच्यासोबत कधीही काम न करण्याची शपथ करणने घेतली आहे, अशी माहिती मीडिया माध्यमातून वेगाने पसरली. त्यात आता बॉलिवूड क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने उडी घेतली आहे. या वादात कंगनाने कार्तिक आर्यनची बाजू घेत करण जोहर वर टीका केली आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, "कार्तिकने त्याचा प्रवास स्वत:च्या हिंमतीवर सुरु केला असून तो चालू आहे. अशावेळी पापा जो आणि त्यांच्या नेपो गँग क्लबला विनंती आहे की त्याला एकटे सोडा. सुशांत सिंह प्रमाणे त्याच्या मागे लागू नका. पुढे ती लिहिते, "गिधाडांनो, त्याला एकटे सोडा. गेट लॉस्ट नेपोज."

दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना लिहिते, "कार्तिक आर्यन चिल्लरांना घाबरण्याची गरज नाही. वाईट आर्टिकल्स आणि स्टेटमेंट जारी करुन ते तुझे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील आणि स्वत: शांत राहून आपली बाजू सावरुन घेतील. त्यांनी सुशांत सिंह राजपूत बद्दलही अशाच ड्रग अॅडिक्शन आणि बेजबाबदारपणे वागण्याच्या स्टोरीज पसरवल्या होत्या."

कंगना रनौत ट्विट्स:

शेवटच्या ट्विटमध्ये कंगनाने कार्तिकाला आम्ही तुझ्यासोबत असल्याचे म्हटले आहे. पुढे ती म्हणते, "जे तुम्हाला घडवत नाहीत ते तुम्हाला तोडू देखील शकत नाहीत. आज तुला एकटं वाट असेल. चहुबाजूंनी तुझ्यावर टीका होतेय असं वाटत असेल. पण असं वाटून घेऊ नकोस. सगळ्यांना हा ड्रामा क्विन जो कसा आहे ठाऊक आहे. तु अजून काही चांगलं करु शकतोस. तुझ्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेव आणि शिस्त पाळ. खूप प्रेम." यासोबत कंगनाने हार्ट इमोजी देखील जोडला आहे.

कंगना रनौत आणि करण जोहर यांच्यातील वाद अत्यंत जूना आहे. या दोघांनी अनेकदा एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तर कंगनाने करण जोहरवर निशाणा साधला होता. दरम्यान, करणवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या कंगनाला आता पुन्हा एकदा टीका करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आहे.