Lok Sabha Election Results 2019: भाजप जिंकलेला पाहून कंगना रनौत हिने तळली भजी

देशभरातील सर्व जगांवरील निकाल जाहीर झाला असून, भाजप 350, काँग्रेस 92, तर इतर पक्षांना 100 जागा मिळाल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक मतदारसंघात या पक्षाच्या दिग्गजांचे पाणीपत झाले आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची केवळ एक जागा निवडूण आली आहे.

Kangana Ranaut | (Photo credit: Instagram )

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमताने सत्तेत आला आणि एनडीएचे सरकार स्थापन होणार हे नक्की झाले. या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi') आणि भाजप अध्यक्ष अमित शाह याना देश आणि जगभरातून शुभेच्छा आल्या. अनेकांनी आनंदाने जल्लोष केला. यात बॉलीवूड स्टार्सचाही समावेश आहे. मात्र, या सगळ्यात हटके आनंद साजरा केला तो अभिनेत्री कंगना रनौत हिने. भाजप जिंकत असल्याची बातमी कळताच कंगनाने थेट भजी (Pakora) तळायला सुरुवात केली. भजी तळत असल्याचा एक फोटोही कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram)  अकाऊंटवर पोस्ट केला आणि भाजप जिंकत अल्याबद्दल आपला राजकीय आनंदही साजरा केला.

आपल्या विविध वक्तव्यांमुळे कंगना रनौत ही अनेकदा वादग्रस्त बनली आहे. दरम्यान, गेल्या काही काळात अनेकदा तिने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणारे तर, काँग्रेस विरोधात वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून भाजपच्या विजयाचा आनंद कंगनाने आपल्या घरीच Pakora (पकोडा) तळून साजरा केला. या वेळी कंगना रनौत हिची बहिण रंगोली चंदेल हीसुद्धा आपल्या परिवारासोबत उपस्थित होती. रंगोली हिनेही या खास क्षणाची प्रतिमा आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. ज्यात कंगना पकौडे म्हणजेच भजी तळताना दिसत आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: निवडणूक निकालाचा प्राथमिक कल समोर येताच रितेश देशमुख याने दिल्या नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा,खिलाडी वृत्तीचं केलं जातंय कौतुक)

कंगना रनौत इन्स्टाग्राम फोटो

लोकसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. देशभरातील सर्व जगांवरील निकाल जाहीर झाला असून, भाजप 350, काँग्रेस 92, तर इतर पक्षांना 100 जागा मिळाल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक मतदारसंघात या पक्षाच्या दिग्गजांचे पाणीपत झाले आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची केवळ एक जागा निवडूण आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif