'कबीर सिंह' ने पार केला 200 करोडचा टप्पा, शाहिद कपूर ने शेअर केली भावनिक पोस्ट
प्रेक्षकांच्या या चित्रपटाला मिळणा-या भरघोस प्रतिसादामुळे 200 करोडचा टप्पा या चित्रपटाने पार केला आहे.
Kabir Singh Box Office Collection: शाहिद कपूर च्या 'कबीर सिंह' (Kabir Singh) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं लावलं असून शाहिद कपूरच्या भूमिकेवर त्याचे सर्व चाहते कौतुकाची थाप देत आहे. हा चित्रपट 200 करोडचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रेक्षकांच्या या चित्रपटाला मिळणा-या भरघोस प्रतिसादामुळे 200 करोडचा टप्पा या चित्रपटाने पार केला आहे. त्याचबरोबर कबीर सिंह हा चित्रपट सोशल मिडियावरही खूप ट्रेंड होत आहे. सलमान खान चा 'भारत' आणि विक्की कौशलच्या 'उरी' चित्रपटाला मागे केवळ 13 दिवसात या चित्रपटाने 200 करोडची कमाई केली आहे.
चित्रपटाला मिळणा-या प्रचंड प्रतिसादामुळे शाहिद कपूर (Shahid Kapoor) खूपच खूश असून त्याने त्या संदर्भात सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये शाहिद कपूर ने असे लिहिले आहे की, "तुम्ही लोकांनी मला इतके प्रेम दिले आहे की, मी जेवढं काही बोलेन तेवढं कमीच असेल. कबीर सिंह पात्राला समजण्यासाठी, माफ करण्यासाठी आणि प्रेम दिल्याबद्दल तुमचे आभार. आपण सर्व आयुष्यात चुका करतो, मात्र आपण त्या सुधारुन आयुष्यात पुन्हा नव्याने सुरुवात केली पाहिजे, जेणे करुन आपण एक चांगले माणूस बनू. कबीर ने खूप चुका करतो. आपण सर्वच करतो. तुम्ही त्याला जज केले नाही, तर तुम्ही त्याला अनुभवले, त्याला समझले. माझ्या या भूमिकेत खूप उणीवा होत्या आणि लोकांनी त्यालाच जास्त प्रेम दिले."
कबीर सिंह चित्रपटात शाहिद कपूर सोबत कियारा आडवाणी (Kiara Advani) सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे निर्देशन संदीप रेड्डी वांगा याने केले आहे. हा चित्रपट साउथ चा चित्रपट 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2019 08:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

