ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांचे डिजिटल माध्यमातून पुनरामन, आपल्या मुलीच्या 'या' कार्यक्रमातून करणार डेब्यू
अलीकडच्या काळापासून अनेक दिग्गजांना वेब सिरीजची ओढ लागली आहे. त्यात आता जितेंद्र कपूर यांचे नाव जोडले गेले आहे.
70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये गाजलेले आणि कित्येक तरुणींच्या हृद्यावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर (Jitendra Kapoor) पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळणार आहेत. मात्र त्यांचा हा डेब्यू रुपेरी पडद्यावरून नाही तर डिजिटल माध्यमातून पाहायला मिळणार आहे. जितेंद्र यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जितेंद्र आपल्या मुलीच्याच म्हणजेच एकता कपूरच्याच ALT Balaji च्या 'बारिश' या डिजिटल कार्यक्रमाच्या दुस-या सिझन मधून पुनरागमन करतील. अलीकडच्या काळापासून अनेक दिग्गजांना वेब सिरीजची ओढ लागली आहे. त्यात आता जितेंद्र कपूर यांचे नाव जोडले गेले आहे.
या कार्यक्रमात शर्मन जोशी आणि आशा नेगी प्रमुख भूमिकेत आहे. यात आता जितेंद्र कपूर एका हिरे व्यापारीची भूमिकेत दिसतील. यात त्यांचे नाव जीतू गांधी असे असेल.
अनुज आणि गौरवी यांच्या सुंदर नात्यावर आधारित या कार्यक्रमाची कथा आहे. काही कारणामुळे यांच्या सुंदर नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा वेळी जितेंद्र यांच्या नात्यातील हा दुरावा दूर करण्याचा आणि या दोघांचा एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना दिसतील. अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले जितेंद्र कपूर यांना डिजिटल शो मधून पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.
लवकरच 'बारिश' चा दुसरा सीजन सुरु होईल. आल्ट बालाजी आणि G5 वर याची स्ट्रिमिंग होईल.