Jersey Release Date: शाहिद कपूर याच्या चाहत्यांसाठी खुशखबर, जर्सी सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित
अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्या 'जर्सी' सिनेमाचा सुद्धा समावेश होता. हा सिनेमा 31 डिसेंबरला 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. तसेच निर्मात्यांकडून सुद्धा या सिनेमासंदर्भात काही अपेक्षा केल्या जात होत्या.
Jersey Release Date: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे काही सिनेमे प्रदर्शित करणे सुद्धा थांबवण्यात आले. नुकत्याच दिल्लीत सिनेमागृह बंद करण्याचे आदेश दिले गेले. कोविड19 च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे काही सिनेमे प्रदर्शित सुद्धा करण्यात आले नाहीत. त्यामध्येच अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्या 'जर्सी' सिनेमाचा सुद्धा समावेश होता. हा सिनेमा 31 डिसेंबरला 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. तसेच निर्मात्यांकडून सुद्धा या सिनेमासंदर्भात काही अपेक्षा केल्या जात होत्या. त्यामुळेच त्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.
सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलल्याने चाहत्यांमध्ये नाराजी दिसली. पण आता हाच सिनेमा फेब्रुवारी मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानुसार बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार, जर्सीच्या निर्मात्यांना तो लवकरच प्रदर्शित करायचा आहे. अशातच त्यांच्याकडून सिनेमा 18 किंवा 25 फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे. सिनेमाच्या सेंसर सर्टिफिकेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर नवी तारीख प्रेक्षकांसाठी जाहीर केली जाणार आहे. हा सिनेमा 2 तास 55 मिनिटांचा असणार आहे.(Nirbhaya Squad: मुंबई पोलिसांनी शेअर केला Rohit Shetty दिग्दर्शित आणि यांच्या दमदार आवाजातील प्रोमो; बॉलिवूड कलाकारांकडूनही व्हिडिओ शेअर)
View this post on Instagram
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा जर्सी सिनेमा तेलगु भाषेतील चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 2019 मध्ये तेलगु भाषेत जर्सी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा तो साउथ मधील प्रेक्षकांना खुप आवडला होता. जर्सी सिनेमात शाहीद एका क्रिकेटरची भुमिका साकारताना दिसून येणार आहे. सिनेमात पंकज कपूर सुद्धा झळकणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 26, 2022 06:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

