Jawan Trailer Burj Khalifa Dubai: बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख खानाचा 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर, चाहत्यांचा आंनद गगनात मावेना (Watch Video)

दुबईतील बुर्ज खलिफावर शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाला आहे. या कार्यक्रमावेळी हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित राहीले.

Jawan Trailer Burj Khalifa Dubai: बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख खानाचा 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर, चाहत्यांचा आंनद गगनात मावेना (Watch Video)
Jawan Movie Trailer Burj Khalifa

Jawan Trailer Burj Khalifa Dubai: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलक नुकताच लॉंच झाला आहे. जवान चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतात या चित्रपटाच्या ट्रेलरनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. किंग खानचे चाहते फक्त भारताता नसून इतर देशातही आहेत. दुबईच्या बुर्ज खलिफा येथे जवान चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांनी हा ट्रेलर पाहून धुमाकुळ घातला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्याच्या वेळी २ हजारांहून अधिक चाहते उपस्थित होते. बुर्ज खलिफावर किंग खानला पाहून चाहत्यांना आनंग आवरेना. या कार्यक्रमात ट्रेलरशिवाय शाहरुख खानच्या ‘जवान’ मधील 'चलेया' या गाण्याचे अरबी व्हर्जनही लाँच करण्यात आले.  अॅक्शन आणि मंनोरंजनानी भरलेला हा चित्रपट चाहत्यांना ट्रेलर पाहूनच वेड लावत आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

 

चित्रपट लवकरच म्हणजे येत्या ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी या चित्रपटातून चित्रपट सुष्टीत पदार्पण केले आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मिती सांभाळली आहे

 

(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2023 10:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).