IMDB Top 10 Indian Films 2021: 'जय भीम' आणि 'शेरशाह' IMDBच्या यादीमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी, पाहा चित्रपटांची यादी
रिलीझनुसार, हा डेटा 'IMBDPRO मूव्ही आणि टीव्ही रँकिंग' मधून घेतला गेला आहे, जो प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या फीडबॅकवर आधारित आहे, जो संपूर्ण वर्षभर साप्ताहिक अपडेट केला जातो.
साउथ सुपरस्टार अभिनेता सुर्याचा (Surya) चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) आणि सिद्धार्थ मल्होत्राचा (Siddharth Malhotra) 'शेरशाह' 2021च्या भारतीय चित्रपटच्या 'इंटरनेट मूव्ही डेटाबेस' (IMDB) यादीमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. आयएमडीबी हे चित्रपट, टीव्ही शो आणि सेलिब्रिटींबद्दल माहितीचा जगातील सर्वात लोकप्रिय स्त्रोत आहे. भारतातील टॉप 10 चित्रपट आणि वेब सीरिजची यादी प्रसिद्ध केली. रिलीझनुसार, हा डेटा 'IMBDPRO मूव्ही आणि टीव्ही रँकिंग' मधून घेतला गेला आहे, जो प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या फीडबॅकवर आधारित आहे, जो संपूर्ण वर्षभर साप्ताहिक अपडेट केला जातो.
तामिळ चित्रपट 'जय भीम' पहिल्या स्थानावर आहे
सत्य घटनांवर आधारित 'जय भीम' हा तामिळ चित्रपट या यादीत प्रथमस्थानी आहे. याचे दिग्दर्शन टीजे ग्रॅनवेल यांनी केले आहे. हा चित्रपट गेल्या महिन्यात 'Amazon Prime Video' वर प्रदर्शित झाला, ज्याला चाहत्यांनकडून आणि समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली. (हे ही वाचा Ganpath Teaser Out: टायगर श्रॉफ आणि कृती सेननच्या 'गणपत' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.)
या यादीत 'शेरशाह' दुसऱ्या स्थानावर आहे.
त्याचवेळी कारगिलचा नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' हा चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅप्टन बत्राची भूमिका सिद्धार्थ मल्होत्रा यांनी केली होती आणि विष्णुवर्धन दिग्दर्शित होते. या चित्रपटाला ही प्रेक्षकांनकडून प्रसिध्दी मिळाली.
IMDB 2021 चे टॉप 10 भारतीय चित्रपटांची यादी
१. जय भीम
२. शेरशाह
3. सूर्यवंशी
4. मास्टर
5. सरदार उधम
6. मिमी
7. कर्णन
8. शिद्दत
9. दृश्यम 2
10. हसीन दिलरुब्बा