Jacqueline Fernandez: जॅकलीनची सुकेशच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे धाव, जेलमधून धमकी दिल्याचा आरोप

जॅकलीननं दिल्ली पोलीस कमिशनर संजय अरोरा यांच्याकडे महाठग सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Jacqueline Fernandez | (Photo Credit - Facebook)

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez) ही पुन्हा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिनं सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे (Delhi Police) तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुकेश हा ईडीच्या (ED)रडारवर आहेत. जॅकलीनची देखील त्या प्रकणात चौकशी झाली आहे. सुकेश मला खूप त्रास देतो आहे. त्याच्या नावानं जेलमधून मला धमक्याही येत आहेत. अशी तक्रार आता जॅकलीननं दिल्ली पोलिसांकडे केली आहे. यापूर्वी देखील जॅकलीननं तिच्या एका मुलाखतीतून तिनं सुकेशबाबत अनेक खुलासे केले होते. (हेही वाचा - SC Rejects Bail Plea of Sukesh Chandrashekhar Wife: सुकेश चंद्रशेखरच्या पत्नीचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacqueline_frenandaz)

जॅकलीननं दिल्ली पोलीस कमिशनर संजय अरोरा यांच्याकडे महाठग सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तो मला मानसिक त्रास आणि धमक्या देत असल्याचे जॅकलीननं म्हटले आहे. यापूर्वी देखील सुकेशनं जॅकलीनच्या नावानं अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यानं जॅकलीन आणि तिच्या कुटूंबियांना काही पैसे दिल्याचेही दिसून आले आहे.

जॅकलीननं म्हटले आहे की, मी एक जबाबदार नागरिक आहे. सुकेशनं यापूर्वी मला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. सुकेश हा जेलमध्ये असून देखील मला कसा काय त्रास देऊ शकतो, पण त्यानं मला प्रचंड मानसिक त्रास दिल्याचे जॅकलीननं म्हटले आहे.