आयटम गर्ल राखी सावंतचे झाले अखेर शुभमंगल सावधान! पाहा कोणाशी झाले राखीचे स्वयंवर

मी माझ्याच एका चाहत्याशी लग्न केलं आहे. एक असा चाहता जो फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो, असं ती म्हणाली.

Rakhi Sawant (Photo Credits: Instagram)

गेल्या अनेक दिवसांपासून म्हणण्यापेक्षा अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या आयटम गर्ल राखी (Rakhi Sawant) सावंत हिच्या लग्नाच्या विषयाला तिने अखेर पुर्णविराम दिला आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या नवरीच्या वेषातील फोटो सोशल मिडियावर टाकल्यानंतर तिने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या फोटोंविषयी राखीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. 'स्पॉटबॉय ई' ला दिलेल्या मुलाखतीत आपण लग्न केले असल्याचे राखीने कबुल केले आहे. मी माझ्याच एका चाहत्याशी लग्न केलं आहे. एक असा चाहता जो फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो, असं ती म्हणाली.

'रितेश असं त्याचं नाव आहे. तो युकेमध्ये व्यावसायिक आहे. तो युकेमध्येच राहतो. किंबहुना तो परतला आहे. माझ्या व्हिसाची कामं सुरु मी लवकरच तेथे रवाना होणार आहे', असं म्हणत राखीने तिच्या लग्नाविषयीची माहिती दिली.

शिवाय बऱ्याच काळापासून टेलिव्हिजन कार्यक्रमांची निर्मिती करण्याची आपली इच्छा होती जी आता साकार होणार आहे, असं म्हणत एक चांगला व्यक्ती पती म्हणून आपल्या आयुष्यात आणल्याबद्दल तिने देवाचे आभार मानलेत.

प्रभू चावला यांच्यासोबतची आपली मुलाखत पाहिल्या नंतर त्याने (चाहत्याने आणि सध्याच्या पतीने) मला मेसेज केला. बोलता बोलता आम्ही चांगले मित्र झालो, असं म्हणत हे सारंकाही जवळपास एक- दीड वर्षापूर्वी झाल्याचं राखीने स्पष्ट केलं.