Coronavirus Lockdown दरम्यान हाल सोसणाऱ्या स्थलांतरीत कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या 'Friday Fast' मोहिमेला अभिनेता इरफान खान याचा पाठिंबा

याची माहिती त्याने ट्विट करत दिली आहे.

Irrfan Khan (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे देशात 24 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व वाहतूक सेवा ठप्प आहेत. त्यामुळे उपजिवीकेसाठी गावाकडून मोठ्या शहरांत आलेल्या कामगारांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे बेरोजगार झालेल्या रोजंदारी कामगारांपुढे अन्न, निवारा यांसारख्या मुलभूत सुविधांचा प्रश्न उभा राहिला. दरम्यान परतीचा मार्गही बंद झाला आहे. अशा अनेक स्थलांतरीत कामगारांसाठी सरकारने मदतकेंद्रे सुरु केली. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक भान असलेले नागरिक यांच्याकडूनही स्थलांतरीत कामगारांना मदत केली जात आहे. यासाठी ग्रामसेवा संघाने 'फ्रायडे फास्ट' (Friday Fast) ही मोहिम सुरु केली आहे. स्थलांतरीत कामगारांसाठी सुरु केलेल्या फ्रायडे फास्ट मोहिमेला बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याने पाठिंबा दर्शवला आहे.

स्थलांतरीत कामगारांना झालेल्या त्रासाबद्दल मी 'फ्रायडे फास्ट' मोहिमेला पाठिंबा देत आहे, असे इरफान खान याने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच या ट्विटमध्ये फास्टसाठी तारीख, वेळ दिली आहे. बदल हा मुळापासून व्हायला हवा, यावर त्याचा विश्वास असल्याने त्याने या मोहिमेला मी पाठींबा देत असल्याचेही त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

इरफान खान ट्विट:

कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर अभिनेता इरफान खान याने यशस्वीरीत्या मात केली आहे. अलिकडेच त्याचा अंग्रेजी मिडियम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका या सिनेमालाही बसला. त्यामुळे आता हा सिनेमा तुम्हाला हॉटस्टारवर पाहता येणार आहे.