Irrfan Khan Dies: इरफान खान यांच्या निधनावर अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, अरविंद केजरीवाल, सुप्रिया सुळे यांच्या सहित 'या' दिग्गजांनी व्यक्त केला शोक

अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सुप्रिया सुळे, संबित पात्रा, अरविंद केजरीवाल, फरहान अख्तर यांच्यासहित अनेकांनी इरफान खान यांच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त करत ट्विट केले आहे.

Irrfan Khan (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचे आज, 29 एप्रिल रोजी निधन झाल्याचे समजत आहे. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबई (Mumbai) मधील कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) त्यांनी शेवटचा श्वास घेतला. एक अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलु  अभिनेता अशी ओळख असणाऱ्या इरफान खान यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी अशाविविध क्षेत्रातील सर्वांनी दुःख व्यक्त केले आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सुप्रिया सुळे, संबित पात्रा, अरविंद केजरीवाल, फरहान अख्तर यांच्यासहित अनेकांनी इरफान खान यांच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त करत ट्विट केले आहे.

2018 मध्ये इरफान खान याला Neuroendocrine Tumour चे निदान झाले होते. त्यानंतर युके मध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते.  Irrfan Khan Dies: इरफानच्या 'लंच बॉक्स' सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत मुंबई डबेवाल्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

अमिताभ बच्चन ट्विट

लता मंगेशकर ट्विट

फरहान अख्तर ट्विट

करण जोहर ट्विट

सोनम कपूर ट्विट

अनुष्का शर्मा ट्विट

अरविंद केजरीवाल ट्विट

उर्मिला मातोंंडकर ट्विट

नुसरत जहाँ ट्विट

सुप्रिया सुळे ट्विट

दरम्यान, प्रकृती अस्वाथामुळे कोलिकाबेन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्या निधनाच्या अनेक चर्चा सुरु होत्या, यांनतर इरफान खान यांच्या प्रवक्त्याकडून इरफान यांची प्रकृती स्थिर आहे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते, मात्र त्यांनतर काहीच तासात त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने सर्वांसाठीचहा मोठा धक्का आहे.