Indo-Pakistani War of 1971: भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे पूर्ण; 'देशातील ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनवण्याची गरज आहे,' 'भुज' अभिनेता शरद केळकरने व्यक्त केल्या भावना

प्रत्येक चित्रपटात हटके भूमिका साकारणारा शरद, भुज: द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटात आर्मी ऑफिसर बनला आणि या अनुभवाबद्दल शरद आपल्या सांगतो, ‘मी नेहमीच वर्दी असलेल्या अधिका-यांचा आदर केला आहे, आणि नेहमीच करतो'

Sharad Kelkar (Photo Credit: Twitter)

अभिनयाच्या बाबतीत टीव्हीनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करून, अल्पावधीतच अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) चाहत्यांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. यासाठी त्याच्या अभिनयासोबत त्याची चित्रपटांची निवड हेदेखील एक महत्वाचे कारण आहे. अलीकडेच शरदचे अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर आता भुज: द प्राइड ऑफ इंडियामध्ये (Bhuj: The Pride Of India) त्याने साकारलेल्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेलाही खूप पसंती मिळाली. भुज हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.

भुज हा चित्रपट 1971 मध्ये घडलेल्या युद्धाची अजरामर गाथा आहे. या ऐतिहासिक लढाईबद्दल शरद म्हणतो, ‘मी खूप भाग्यवान आहे की मला या चित्रपटात लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मला वाटते की आपल्या संस्कृतीवर आणि देशातील उल्लेखनीय ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनवण्याची गरज आहे. हे जे स्वातंत्र्य आपण सर्वजण उपभोगत आहोत, ते आपल्या शूर जवानांच्या अनेक बलिदानानंतर मिळाले आहे. भुज: द प्राईड ऑफ इंडिया सारखे चित्रपट आपल्या इतिहासाच्या कथा जिवंत करतात.’

अजय देवगणसोबत सलग तीन चित्रपट करणे ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे शरद सांगतो. तो अजयबद्दल म्हणतो, ‘त्याच्यासोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. त्याच्यासोबत काम करताना घरच्यासारखे वाटते. अजय एक उत्तम अभिनेता आहे, त्यासोबत तो एक चांगला निर्माता देखील आहे. त्याची संपूर्ण टीमच खूप वेगळी आहे. यावेळी भुजमध्ये त्याने मला आर्मी ऑफिसर आर के नायरची खास भूमिका दिली आहे.’ 26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. (हेही वाचा: RRR: राम चरणला 'अल्लुरी सीताराम राजू' या भूमिकेसाठी खूप घ्यावी लागली मेहनत, ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ केला शेअर)

प्रत्येक चित्रपटात हटके भूमिका साकारणारा शरद, भुज: द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटात आर्मी ऑफिसर बनला आणि या अनुभवाबद्दल शरद आपल्या सांगतो, ‘मी नेहमीच वर्दी असलेल्या अधिका-यांचा आदर केला आहे, आणि नेहमीच करतो. की मी डिफेंस कंबाइंडची परीक्षा पास झालो होतो, परंतु फायनल इंटरव्ह्यू देऊ शकलो नाही. माझ्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. सैन्यात माझे खूप मित्र आहेत आणि मी नेहमी त्यांच्या वागण्याचे अनुसरण करतो आणि त्यामुळेच मी आर.के.नायरची भूमिका साकारू शकलो.’

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now