पाहा Ileana D'cruz काय म्हणाली 'सेक्स लाईफ' बद्दल
इलिआना एकदा म्हणाली होती की, 'सेक्स आणि प्रेमाचा काहीच संबंध नसतो'.
अनेक बॉलीवूड चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री इलिआना डिक्रुझ (Ileana D'cruz) कायमच सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता मात्र तिने सेक्स लाईफबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे.
इलिआना नुकतीच शिबानी दांडेकर हिच्या 'The Love Laugh Live Show' मध्ये गेस्ट म्हणून उपस्थित राहिली होती. शोदरम्यान दोघींमध्ये अनेक विषयांवर चर्चा रंगली. ही चर्चा सुरु असताना अचानक शिबानी ने इलिआनाला तिच्या एका जुन्या वक्तव्याबद्दल आठवण करून दिली. इलिआना एकदा म्हणाली होती की, 'सेक्स आणि प्रेमाचा काहीच संबंध नसतो'.
याबद्दल शिबानीने तिला प्रश्न विचारला असता, इलिआना म्हणाली की, "माझ्या वक्तव्याबद्दल लोकांनी समज करून घेतला होता की मी सेक्स एन्जॉय करते आणि त्याकडे वर्कआऊट म्हणून बघते, पण हे अत्यंत चुकीचं आहे."
"माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की, माझ्या मते सेक्स एन्जॉय करावा पण त्यामागे भावनादेखील असल्या पाहिजेत. जेव्हा तुमच्यात प्रेम असते तेव्हा सेक्स करणं चांगलं वाटतं. यात दोन व्यक्तींच्या आत्मा सहभागी होत असतात," असं तिने स्पष्टीकरण दिलं.
यासोबतच इलिआनाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक सिक्रेट्स सांगितले व आपल्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला. इलिआना व तिच्या बॉयफ्रेंडमध्ये खूप भांडणं व्हायची. त्यानंतर त्यांनी वाद सोडवला नाही आणि ब्रेकअप केले. आता ती पागलपंती या आगामी चित्रपटुन झळकणार आहे.
अभिनय सोडून पॉर्न क्षेत्राकडे वळली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; वाचा काय होतं त्यामागचं कारण
इलिआनाने आजवर मैं तेरा हीरो, रुस्तम, मुबारकां, बादशाहो व रेड अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असून तिच्यासोबत जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, उर्वशी रौतेला व पुलकीत सम्राट यांसारखे प्रसिद्ध कलाकार दिसतील.