Holi 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)
घराच्या गॅलरीमध्ये तैमूर पिचकारीने होळीच्या सणाचा आनंद लुटतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
Taimur Ali Khan Holi Celebration: स्टार किड आणि सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या गळ्यातला ताईत तैमूर अली खान (Taimur Ali Khan) रोज कुठे जातो? काय करतो याची इत्यंभूत माहिती पॅपराझिंमुळे लोकांना मिळत असते. आज होळीचा सण आहे. त्यामुळे तैमूर अली खानचं यंदाचं होळी (Holi 2019) सेलिब्रेशनदेखील सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. घराच्या गॅलरीमध्ये तैमूर पिचकारीने होळीच्या सणाचा आनंद लुटतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
तैमूर अली खानचं होळी सेलिब्रेशन
View this post on Instagram
Tim is playing with pichkaris 😂😍❤💙💚💛💜 📹- @viralbhayani #taimuralikhan
A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhanworld) on
रोज सैफ अली खान सोबत फिरताना, खेळताना दिसणारा तैमूर सैफ करीनाच्या घराच्या परिसरात होळी खेळताना दिसला. तैमूर सोबत सोहा अली खानची मुलगी आणि तैमूरची बहीण इनाया देखील होती. दोघांनी आज धुलिवंदनाचा आनंद लुटताना पाणी आणि रंगांसोबत होळी सेलिब्रेशन केलं.
इनायाचं होळी सेलिब्रेशन
इनाया आणि तैमूर हे दोघेही सोशल मीडियात स्टार किड्सच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. करीना आणि सैफ सोबतच इतर कलाकारांच्या लोकप्रियतेला तैमूर अली खान टक्कर देत आहे. आज धुलिवंदनाचा दिवस आहे. देशासह परदेशात आज आनंदाचं वातावरण आहे. अनेक कलाकारांनी, राजकीय मंडळींनी आज धुळवड साजरी केली आहे.