सलमान खान च्या 'दबंग 3' मधील या गाण्यामुळे चित्रपटात अडकला वादाच्या भोव-यात, प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, या गाण्यामुळे 'हुड हुड दबंग' (Hud Hud Dabangg) या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
दबंग चित्रपटानंतर 'दबंग खान' म्हणून सलमानला ओळख मिळाली. दबंग चित्रपटाच्या पहिल्या पार्टपासून या चित्रपटातील सलमानची (Salman Khan) भूमिका, गाणी आणि मुख्य म्हणजे त्यातील डायलॉग्सने प्रेक्षकांना उचलून धरले. दबंगच्या पहिल्या 2 पार्ट नंतर आता सर्वांनाचा 'दबंग 3' (Dabangg 3) ची उत्सुकता लागून लागली आहे. मात्र या चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर यातील एका गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोव-यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, या गाण्यामुळे 'हुड हुड दबंग' (Hud Hud Dabangg) या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
रिपब्लिक वर्ल्ड वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 'दबंग 3' या चित्रपटातील 'हुड हुड दबंग' या टायटल साँगमध्ये हिंदूच्या भावना दुखावणारे आक्षेपार्ह सीन्स दाखवण्यात आले आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. या गाण्यामध्ये काही ऋषी सलमानसोबत आक्षेपार्ह पद्धतीने डान्स करताना दिसतात. हे सगळे हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचे या समितीचे महाराष्ट्र व झारखंडचे आयोजक सुनील घंवात यांनी म्हटले आहे.
दबंग 3 चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवा (Prabhu Deva) यांनी केले असून त्याचे निर्मिती सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटातून सलमान खान याच्यासह सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), सई मांजरेकर (Sai Manjrekar) मुख्य भुमिकेतून दिसणार आहे. तर मंगळवारी सई हिने तिच्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरुन तिचा दबंग 3 मधील लूक झळवकला असून ती सलमान खान याच्या प्रेयसीची भुमिका साकारणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला दबंग 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेदेखील वाचा- 'Dabangg 3' चं टायटल ट्रॅक रिलीज करताना सलमान खानने वापरला हा अनोखा फंडा; पाहा व्हिडिओ
सलमान खान याच्या दबंग 3 मधून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर डेब्यु करणार आहे. ट्रेलरमधील काही दृष्यांमधून सई सोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. त्याचसोबत सलमान दोन विविध अवतारात सुद्धा झळकणार आहे. दबंगच्या भुमिकेतील सलमान खान यापूर्वीच्या दबंग चित्रपटाच्या सिक्वल सारखीच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा ठरणार आहे