Happy Birthday Sonu Sood: जन्मभूमी पंजाब पण कर्मभूमी महाराष्ट्र, जाणून घ्या अभिनेता सोनू महाराष्ट्र कनेक्शन

अभिनेता सोनू सूद आज त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) आज त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.  यावर्षीचा वाढदिवस सोनूसाठी खास आहे कारण आता केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर एक उत्तम समाज सेवक अशी ही सोनूची ख्याती आहे. आज सोनूवर त्याच्या फॅन्स (Fans) कडूनच नाही तर कोव्हिड काळात त्याने मदत केलेल्या गरजूंकडूनही सोनू सूदवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अभिनेता सोनू सुदची जन्मभुमी पंजाब (Punjab) असली तरी त्याची कर्मभूमी महाराष्ट्र (Maharashtra) आहे हे म्हणणं नाकारता येणार नाही. कारण सोनूने त्याचं शिक्षण (Education)  किंवा त्याच्या अॅक्टींग करिअरला (Acting Career) महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. अभिनेता सोनू सूद एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर (Electronics Engineer) असुन नागपूरच्या  (Nagpur) YCCE  या महाविद्यालयातून त्याचं अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केलं आहे.

 

त्यानंतर कलाक्षेत्रात रुची असणाऱ्या सोनूने मुंबई (Mumbai) गाठत अॅक्टींग क्षेत्रात आपलं निशब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आलं नाही. त्यानंतर त्याने आपल्या प्रयत्नांचा मोर्चा टॉलिवूडच्या (Tollywood) दिशेने वळवला आणि त्याने त्याचा पहिला सिनेमा तमिळ (Tamil) भाषेत केला. त्यानंतर तेलगु (Telegu), कन्नड (Kannada) अशा विविध भाषेत काम करत सोनू सूद साउथ फिल्म इंडस्ट्रीचा (film Industry) मेगा स्टार झाला. नंतर सोनूला पहिला हिंदी सिनेमा मिळाला दी लिजंड ऑफ भगत सिंह (The Legend Of Bhagat Singh). बॉलिवूड (Bollywood) मधील हा डेब्यू त्याच्यासाठी महत्वाचा ठरला कारण त्यानंतर त्याला अनेक हिंदी सिनेमे मिळालेत आणि बॉलिवूडमध्ये त्याची एक विशेष ओळख निर्माण झाली. (हे ही वाचा:- Rasik Dave Passed Away: छोट्या पडद्यावरील सुप्रसिध्द अभिनेते रसिक दवे यांचं निधन)

 

अभिनेता सोनू सूदने फक्त अभिनयातूनचं नाही तर देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वाची मन जिंकली. त्याने कोरोना महामारी (Corona Pandemic) प्रसंगी देशांतील मजूर वर्गाला त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनाची तसचं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून आपली विशेष ओळख निर्माण केली.संपूर्ण जग महामारीचा सामना करीत असतांना अभिनेता सोनू सूद गरिबांच्या सेवेसाठी देवदूताप्रमाणे धावून आला.

 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif