Gadar 2 OTT Release: लवकरच 'गदर 2' ओटीटीवर येणार; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल

'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होईल. 'गदर 2' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Gadar 2 Poster (PC- Twitter)

अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा चित्रपटगृहात सध्या जोरदार कमाई करत असून अनेक नवीन विक्रम देखील रचत आहे. रविवारी 10 व्या दिवशी या सिनेमाने 41 कोटीची कमाई केली असून हा पण एक विक्रम आहे. सध्या हा सिनेमा 400 कोटीच्या कमाईचा टप्पा पार करण्याच्या तयारीत असून त्यातच गदर 2 बद्दल एक नवीन अपडेट आली आहे. गदर 2 हा सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

'गदर 2' हा सिनेमा आणखी दोन महिन्यांनी ओटीटीवर रिलीज होईल. अद्याप ओटीटी रिलीजची तारिख ठरलेली नाही. दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येईल. 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होईल. 'गदर 2' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पठाण, बाहुबली 2, केजीएफ 2, दंगल, संजू, पीके, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, वॉर या सिनेमांप्रमाणे 'गदर 2' हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार करेल.

या चित्रपटाने आतापर्यंत 389 कोटींची कमाई केली आहे. सोमवारी या चित्रपटाने 14 कोटी रुपयाची कमाई केली आहे. प्रदर्शनानंतर दुसऱ्या मंगळवारी या चित्रपट  11 कोटी रुपये कमावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे . यामुळे भारतात एकूण संकलन ₹ 400 कोटी होईल .