Gadar 2 Box Office Collection: 'गदर 2' चित्रपटाची 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री

एका आठवड्यात या चित्रपटाने 283 कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी 19.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Gadar 2 Box Office Collection: 'गदर 2' चित्रपटाची 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
Gadar 2 Poster (PC- Twitter)

सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाची धमाकेदार कमाई अजूनही सुरूच आहे. या चिया चित्रपटाची जादू चाहत्यांच्या मनावर पसरली आहे. 'गदर 2'चे दिवसाआड वाढणारे कलेक्शन पाहता आता हा चित्रपट नक्कीच नवा विक्रम रचू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. आता या चित्रपटाचे आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. त्याबरोबरच ‘गदर 2’ने 300 कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एन्ट्री घेतली आहे. आज शनिवार आणि उद्या रविवार सुट्टी असल्याने या दोन दिवसात देखील चित्रपट मोठी कमाई करु शकतो अशी शक्यता आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम केले असून या चित्रपटासोबत रिलीज झालेल्या ओएमजी 2 अजूनही कमाईच्या बाबतीत गदरच्या खूपच मागे आहे.

'गदर 2'चे आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने आता 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यासाठी हा पहिला विकेंड अतिशय दमदार ठरला आह. एका आठवड्यात या चित्रपटाने 283 कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी 19.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 304 कोटींची कमाई ही केली आहे. आता दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट एखादा नवा विक्रम रचू शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).