Russia-Ukraine War: RRR पासून ते Salman Khan च्या Tiger 3 पर्यंत 'या' प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग झाले आहे युक्रेनमध्ये

हे गाणे एहान भट आणि एलिस वर्गास यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर या गाण्यात मनीषा कोईरालाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

2.0, Winner Film Poster - (PC - Facebook Instagram)

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमधून सतत नवनवीन बातम्या येत आहेत. तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पहिल्या दिवसाच्या युद्धात 137 लोक मारले गेले आहेत. हे युद्ध जरी रशिया-युक्रेन यांच्यातले असले तरी या दोन्ही देशांमधील युद्धाच्या परिणामामुळे संपूर्ण जग ढवळून निघाले आहे. या युद्धाचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे.

परंतु, तुम्हाला माहित आहे का, असे अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत. ज्याचे शूटिंग युक्रेनमध्ये झाले आहे. युक्रेन चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. युक्रेनच्या सुंदर शहरांमध्ये कोणत्या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे यासंदर्भात जाणून घेऊयात...(वाचा - Gangubai Kathiawadi Box Office Collection: 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई, जाणून घ्या)

आरआरआर (RRR)

आलिया भट्ट तिच्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असते. तिचा चित्रपट RRR ज्यामध्ये अजय देवगण, जूनियर एनटीआर यांचा समावेश आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, RRR चे शूटिंग युक्रेनमध्ये झाले आहे आणि लवकरच हा चित्रपट पडद्यावर येणार आहे.

Tiger 3 (टाइगर 3)

सलमान खान कतरिना कैफ स्टारर चित्रपट टायगर 3 च्या शूटिंगचा काही भाग देखील युक्रेनमध्ये शूट करण्यात आला आहे. टायगर 3 अजून रिलीज झालेला नाही. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपटात इमरान हाश्मी देखील दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत सुरू आहे आणि चाहते खूप दिवसांपासून त्याची वाट पाहत आहेत.

2.0

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा चित्रपट 2.0 चे Tunnel of Love हे गाणे युक्रेनमध्ये शूट करण्यात आले होते. अक्षय कुमारने चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती आणि चाहत्यांना त्याची शैली खूप आवडली होती. या चित्रपटात दाखवलेले गाणे त्या देशाच्या टनेल ऑफ लव्हमध्ये गायले होते.

विनर (Winner)

विनर चित्रपटात रकुल प्रीत सिंह आणि साई धरम तेज यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केले आहे. या चित्रपटाची अनेक दृश्ये युक्रेनमधील कीव, ल्विव येथे शूट करण्यात आली आहेत. युक्रेनमध्येही अनेक गाण्यांचे चित्रीकरण झाले आहे.

99 सॉन्ग (99 Song)

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक एआर रहमान यांनी लिहिलेले आणि निर्मिती केलेले गाणे 99 चे चित्रीकरण युक्रेनमध्ये झाले आहे. हे गाणे एहान भट आणि एलिस वर्गास यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर या गाण्यात मनीषा कोईरालाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.