Celebs Who Died In 2022: लता मंगेशकर ते राजू श्रीवास्तवपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी 2022 मध्ये घेतला जगाचा निरोप

मनोरंजन क्षेत्रासाठी हे वर्ष अत्यंत दुःखद ठरले आहे. यावर्षी आपण अनेक प्रसिद्ध व्यक्तींना कायमचे गमावले. ज्याची भरपाई कधीच शक्य नाही, जाणून घ्या सविस्तर

लता मंगेशकर, राजू श्रीवास्तव, केके (Photo Credits: Wikimedia Commons/Insta)

Indian Celebs Who Died In 2022: मनोरंजन क्षेत्रासाठी हे वर्ष अत्यंत दुःखद ठरले आहे. यावर्षी आपण अनेक प्रसिद्ध व्यक्तींना कायमचे गमावले. ज्याची भरपाई कधीच शक्य नाही. लता दीदी ते राजू श्रीवास्तव, बप्पी लहरी आणि गायक केके व्यतिरिक्त, इतर अनेक सेलिब्रिटींनी 2022 मध्ये या जगाचा निरोप घेतला. या वर्षी कोणत्या सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला, जाणून घ्या सविस्तर [ हे देखील वाचा : Year Ender 2022: राजकारणापासून ते मनोरंजनापर्यंत, 2022 या वर्षात घडलेल्या देशातील काही महत्वाच्या मोठ्या घटना, जाणून घ्या सविस्तर]

पंडित बिरजू महाराज

पंडित बिरजू महाराज हे भारतीय कथ्थक डान्सर, संगीतकार आणि गायक होते. 16 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या अगदी एक महिना आधी, त्यांचे निधन झाले. 

पंडित बिरजू महाराज [Social Media]
भारतरत्न लता मंगेशकर 

वर्षाच्या सुरुवातीला 6 फेब्रुवारी 2022 रोजी स्वर कोकिळा लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. भारतरत्न लता दीदींनी जवळपास 16 भाषांमध्ये 6500 हून अधिक गाणी गायली आहेत. लता दीदी यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


गायिका लता मंगेशकर आणि पीएम मोदी फोटो क्रेडिट: ट्विटर)

बप्पी लहरी

बप्पी लहरी यांचे 15 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईत ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे निधन झाले होते. यांनी बॉलिवूडशिवाय बंगाली, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांची गाणी आजही खूप लोकप्रिय होती. 

बप्पी लहरी (Photo Credits: Instagram)

सिद्धू मुसेवाला

29 मे 2022 रोजी मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्यानंतर त्यांचे दुःखद निधन झाले.सिद्धू मुसेवाला हा एक भारतीय संगीतकार, रॅपर, गीतकार आणि अभिनेता होता, जो पंजाबी संगीत आणि सिनेमातील त्यांच्या कामासाठी ओळखला जातो. 

सिद्धू मूसेवाला (Photo Credits: Twitter)

के के  [कृष्णकुमार कुन्नथ]

कृष्णकुमार कुन्नथ, ज्यांना बहुतेक लोक KK या नावाने ओळखले जात होते, ते एक प्रख्यात पार्श्वगायक होते. त्यांनी 31 मे 2022 रोजी कोलकाता येथील नजरुल मंच सभागृहात लाइव्ह कॉन्सर्ट सादर केला. लाइव्ह शोदरम्यानच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

केके (Photo Credits: Instagram)

दीपेश भान

भाभी जी घर पर हैं या टीव्ही शोमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या दीपेश भानचे 23 जुलै 2022 रोजी निधन झाले. मृत्यूची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.

दीपेश भान (Photo Credits: Instagram)

राजु श्रीवास्तव

जगाला हसवणारे राजु श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वांना रडवून जगाचा निरोप घेतला. त्यांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजू श्रीवास्तव (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम)

अरुण बाली

पीके आणि लाल सिंग चड्ढा यांसारख्या अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसलेल्या अरुण बाली यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला.

अरुण बाली (Photo Credits: Twitter)

वैशाली ठक्कर

ससुराल सिमर का फेम वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबर २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला. तिने  इंदोर येथे राहत्या घरी आत्महत्या केली. 

वैशाली ठक्कर Credit-Social media

सिद्धार्थ वीर सूर्यवंशी

कुसुम आणि कसौटी जिंदगी सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये अभिनेता म्हणून काम केलेल्या सिद्धार्थ वीर सूर्यवंशी यांना जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 46 व्या वर्षी 11 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सिद्धांत वीर सूर्यवंशी - जय भानुशाली (Photo Credits: Instagram)

अनेक कलाकारांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. असे कलाकार परत होणे नाही. बॉलीवूडसाठी हे वर्ष खूप दुखद ठरले कारण एका मागून एक दिग्गज कलाकार बॉलीवूडने गमावले आहे.

 

 

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now