First AI Use Indian Cinema: एआर रहेमान AI च्या मदतीने दिवंगत गायकांच्या आवाजात गाणी आणणार प्रेक्षकांच्या भेटीला

मला वाटतय की, भविष्यात त्यांची मला मदत होईल.

संगीतकार एआर रहेमान (AR Rahman) रजनीकांत (Rajnikanth) यांच्या 'लाल सलाम' (Lal Salaam) या सिनेमातील दिवंगत गायकांचा आवाज बनवण्यासाठी एआयचा वापर केला आहे. हा एक प्रयोग आहे. यामध्ये मला 70 टक्के यश आले आहे. ज्या गायकांच्या आवाजाचा वापर करण्यात आला त्यांच्या कुटुंबियांशी देखील परवानगी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. लाल सलाम या सिनेमाची दिग्दर्शक ऐश्वर्या या आवाजाच्या शोधात होत्या असे रेहमान यांनी सांगितले.

रहेमान म्हणाले की, मी निधन झालेल्या या गायकांच्या कुटुंबियांशी बातचित करुन याबाबत परवानगी मागितली. मला वाटतय की, भविष्यात त्यांची मला मदत होईल. पुढे बोलताना ते म्हणाले की, गाणी आणि धुन रेकॉर्ड करण्यासाठी मी त्यांची परवानगी मागितली असून त्यांना या गाण्यांसाठी त्यांच्या अधिकारांची किंमत देखील देणार असल्याचे सांगितले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)

दिवंगत गायकांचे कुटुंबिय रहेमान यांच्याशी बोलताना म्हणाले की, "आम्हाला फार आनंद होतोय की, आमच्या वडिलांच्या आठवणी कोणीतरी पु्न्हा एकदा जागवत आहे. त्याच्याबदल्यात आम्हाला किंमतही मिळणार आहे." पुढे बोलताना एआर रहेमान म्हणाले, "मी वैधपणे पुढे जाण्याचे ठरवले. त्यांच्या कुटुंबियांकडे जाण्याची ही चांगली संधी होती."