Firing Outside Punjabi Singer AP Dhillon's House: कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये पंजाबी गायक एपी धिल्लन यांच्या घराबाहेर गोळीबार
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
Firing Outside Punjabi Singer AP Dhillon's House: कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये पंजाबी गायक आणि रॅपर एपी धिल्लन (Punjabi Singer AP Dhillon) यांच्या घराबाहेर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. गोळीबाराचा एक व्हिडिओही समोर आला असून आता सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. या बातमीनंतर एपी ढिल्लनच्या चाहत्यांमध्येही खळबळ उडाली आहे. गायकाचे घर कॅनडातील (Canada) व्हँकुव्हर (Vancouver) येथे आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराबाहेर गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.
लोरेश विश्नोई रोहित गोदारा टोळीने स्वीकारली गोळीबाराची जबाबदार -
प्रसिद्ध पंजाबी गायक एपी धिल्लन यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लोरेश विश्नोई रोहित गोदारा टोळीने स्वीकारली आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या गोळीबाराच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, व्हिक्टोरिया आयलंड परिसरातील गायकाच्या घराजवळ गोळीबाराचा आवाज आला. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, 1 सप्टेंबरच्या रात्री कॅनडात दोन ठिकाणी गोळीबार करण्यात आला. यातील पहिला गोळीबार व्हिक्टोरिया बेटावर तर दुसरा टोरंटोच्या वुडब्रिजवर करण्यात आला. (हेही वाचा -Money Laundering Case: YouTuber Elvish Yadav ला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवीन ED Summons जारी; लखनऊ कार्यालयात राहावे लागणार हजर)
फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, '1 सप्टेंबरच्या रात्री आम्ही कॅनडात दोन ठिकाणी गोळीबार केला, त्यापैकी एक व्हिक्टोरिया आयलंड आणि वुडब्रिज टारनोन्टो आहे. या गोळीबाराची जबाबदारी आम्ही रोहित गोदारा लोरेश विश्नोई टोळी घेत आहोत. व्हिक्टोरिया आयलंडचे घर एपी ढिल्लन यांचे आहे. या पोस्टमध्ये सलमान खानचाही उल्लेख करण्यात आला आहे. तुम्ही लोक अंडरवर्ल्डच्या जीवनाची नक्कल करता, पण प्रत्यक्षात आम्ही ते जीवन जगत आहोत. तुमच्या मर्यादेत राहा नाहीतर कुत्र्याच्या मरणाने मराल.' (हेही वाचा - Sidhu Moose Wala Murder Case: पंजाबी गायक सुद्धू मूसेवाला यांच्यावर आज अंत्यसंस्कार; चाहत्यांची मोठी गर्दी)
एपी धिल्लन गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू -
सोशल मीडियावरील या पोस्टची आणि गोळीबाराची पोलिस चौकशी करत आहेत. याआधीही गोल्डी लॉरेन्स टोळीने काही महिन्यांपूर्वी परदेशात गिप्पी ग्रेवालच्या घरावर गोळीबार केला होता. यावर कॅनडाच्या पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.