Fardeen Khan Transformation Photos: फरदीन खान चा ट्रान्सफॉर्मेशननंतरचा लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

त्याचे हे फोटोज पाहून पूर्वीचा त्याच चॉकलेट बॉयचा लूक त्याच्या चाहत्यांना नक्कीच आठवेल. त्याचे हे फोटोज पाहून तो कदाचित बॉलिवूडमध्ये पुनरागमनही करू शकतो.

Fardeen Khan Body Transformation (Photo Credits: Yogen Shah)

नो एन्ट्री, दुल्हा मिल गया, जंगल, प्यार तूने क्या किया यांसारख्या चित्रपटातून समोर आलेला अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) गेली अनेक वर्षे बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून लांब होता. त्यात मध्यंतरी त्याचे काही फोटोज समोर आले होते. त्यात तो प्रचंड स्थूल दिसत होता. मात्र नुकतेच समोर आलेले त्याचे फोटोज पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. यात त्याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन (Body Transformation) केलेले दिसत आहे. ज्यात त्याने बरेच वजन घटविल्याचे दिसत आहे. त्याचे हे फोटोज पाहून पूर्वीचा त्याच चॉकलेट बॉयचा लूक त्याच्या चाहत्यांना नक्कीच आठवेल. त्याचे हे फोटोज पाहून तो कदाचित बॉलिवूडमध्ये पुनरागमनही करू शकतो.

फरदीन खान मोठ्या पडद्यापासून गेला अनेक काळ दूर राहिल्याने त्याचे चाहते त्याला प्रचंड मिस करत होते. तसेच मध्ये त्याचा स्थूल झालेला फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. मात्र त्याचे नुकतेच समोर आलेले फोटोज पाहून त्याचे चाहते प्रचंड खूश आहेत.

Fardeen Khan Body Transformation (Photo Credits: Yogen Shah)

फरदीनचे हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. फरदीन खान मिडियाद्वारे मुंबईमध्ये स्पॉट करण्यात आला. ज्यात तो खूपच स्लिम आणि फिट दिसत होता.

खरे पाहता, फरदीन खान काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक मुकेश छाबड़ाच्या कार्यालयात स्पॉट केला गेला होता. त्यावेळी त्याचा अंदाज एकदम वेगळा दिसत होता. मात्र दिग्दर्शकाच्या कार्यालयाबाहेर तो दिसल्याने कदाचित तो लवकरच चित्रपटात दिसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif