ईशा देओलला पुन्हा एकदा झाला कन्यारत्नाचा लाभ, मुलीचे ठेवले 'हे' नाव

सोमवारी सकाळी ईशा ने इन्स्टाग्रामवर 'आम्हाला 10 जूनला मुलगी झाली जिचे नाव आम्ही 'मिराया तख्तानी' (Miraya Takhtani) असे ठेवले आहे, असे पोस्ट केले होते.

हिंदीतील सुपरस्टार धमेंद्र यांची कन्या आणि अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol-Takhtani) हिने पुन्हा एकदा एका गोंडस परीला जन्म दिला आहे. नुकतीच ईशाने सोशल मिडियाद्वारे याबाबत ट्विट केले आहे. सोमवारी सकाळी ईशा ने इन्स्टाग्रामवर 'आम्हाला 10 जूनला मुलगी झाली जिचे नाव आम्ही 'मिराया तख्तानी' (Miraya Takhtani) असे ठेवले आहे, असे पोस्ट केले होते. ईशावर सर्व बॉलिवूड जगतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बाळ आणि ईशा दोघेही सुखरुप असून लवकरच तिला घरी सोडण्यात येईल असे सांगण्यात येतय.

जानेवारी महिन्यात ही बातमी समोर आली होती की, ईशा देओल पुन्हा एकदा आई होणार आहे. तिचे बेबी बम्प्स दिसणारे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ईशा देओल आणि भरत तख्तानी एक मोठी मुलगी आहे जिचे नाव राध्या आहे. राध्या चा जन्म 20 नोव्हेंबर 2017 झाला होता. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचे लग्न 2012 साली झाले होते.

लग्नापूर्वीच आई बनणार अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाह, सोशल मीडियात 'बेबी बंप' दिसणारे फोटो व्हायरल

ईशा देओल सिनेमा जगतापासून जरी दूर असली तरी ती सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असते. तिच्या आयुष्यातले ब-याच चांगल्या आठवणीं ती सोशल मिडियावर फोटो टाकून शेअर करत असते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif