Salman Khan-Katrina Kaif च्या 'Tiger 3' सिनेमात Emraan Hashmi झळकणार निगेटीव्ह भूमिकेत; लवकरच शूटिंगला सुरुवात
यापूर्वी सिनेमाबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.
Emraan Hashmi in Tiger 3: सलमान खान (Salman Khan) आणि कैटरीना कैफ (Katrina Kaif) लवकरच 'टायगर 3' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करतील. यापूर्वी सिनेमाबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आपल्या रोमांटिक आणि इंस्टेंस किसिंग स्टाईलने प्रेक्षकांना इम्प्रेस करणारा इमरान हाशमी सिनेमात विलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. मार्च महिन्यापासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. सिनेमाचे निर्माते यशराज फिल्म्सला (Yashraj Films) सिनेमातील निगेटीव्ह भूमिकेसाठी एक नवा चेहरा हवा होता. टायगर जिंदा है मध्ये देखील नकारात्मक भूमिकेसाठी सज्जाद डेलाफ्रूज च्या रुपाने नवा चेहरा लोकांसमोर आला होता.
ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार, यशराज फिल्म्समध्ये इमरान हाशमी याला निगेटीव्ह भूमिकेसाठी कास्ट करण्याचा विचार केला जात आहे. तसंच त्या भूमिकेसाठी इमरान हाशमी अगदी एकदम योग्य असल्याचा निर्णयापर्यंत निर्माते पोहचले आहेत. दरम्यान, पठान सिनेमाच्या अंती काही सीन्समध्ये सलमान खान देखील झळकणार आहे. शाहरुख खान याच्या पठान सिनेमाची पुढील कथा टायगर 3 मध्ये पाहायला मिळणार आहे, असे काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. (Salman Khan च्या 'Radhe: Your Most Wanted Bhai' चित्रपटाने प्रदर्शनाआधीचं कमवले 230 कोटी)
या सिनेमाचे पहिले शेड्यूल यशराज फिल्म्समध्येच शूट केले जाईल. मार्च महिन्यापासून सुरु होणाऱ्या शूटमध्ये सलमान-कैटरीना सोबत इमरान देखील असेल. या सिनेमाचे दुसरे शूटिंग शेड्युल मिडल ईस्ट आणि तिसरे शेड्यूल मुंबईत होईल. (Antim: Salman Khan सोबत 'अंतिम' चित्रपटात रोमांस करणार दाक्षिणात्य अभिनेत्री Pragya Jaiswal; पहा अभिनेत्रीचे Hot Photos)
सलमान आणि कैतरीनाची जोडी 'युवराज', 'पार्टनर', 'मैंने प्यार किया क्या' आणि 'एक था टायगर' या सिनेमांमध्ये हिट झाली आहे. यासोबतच सलमान खानने रणबीर कपूर आणि कैतरीना कैफच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटातही विशेष भूमिका साकारली होती.