Dus Bahane 2.0 Song: श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्या हटके स्वॅगमधील Baaghi 3 मधील 'दस बहाने' रिमेक गाणे प्रदर्शित; Watch Video

या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रिन्स गुप्ता याने केली आहे.

Dus Bahane Baaghi Song (Photo Credits: YouTube)

'बागी' आणि 'बागी 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार आणि हटके अॅक्शन सीन्स आणणारे दिग्दर्शक अहमद खान आता लवकरच 'बागी 3' (Baaghi 3) सिनेमा आपल्या भेटीला घेऊन येत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील 'दस बहाने' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha Kapoor) या गाण्यात दमदार स्वॅग सादर केला आहे. हे गाणे 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दस' चित्रपटातील गाण्याचे हे रिमेक आहे. बागी 3 मधील हे गाणे विशाल शेखर, शान, केके आणि तुलसी कुमार यांनी हे गाणे गायिले आहे.

हे गाणे पंची जलोन्वी यांनी लिहिले असून विशाल शेखर या गाण्याचे संगीतकार आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रिन्स गुप्ता याने केली आहे.

पाहा गाणे:

हेदेखील वाचा- Baaghi 3 Official Trailer: धमाकेदार Action Scene सह अभिनेता टायगर श्रॉफ याच्या बागी 3 चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)

या गाण्यामध्ये खूप सुंदर लोकेशन्स वापरण्यात आली आहे. अंकिता लोखंडे ही श्रद्धा कपूर हिच्या मैत्रिणीची भुमिका साकारणार आहे. अहमद खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 6 मार्चला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'बागी 3' व्यतिरिक्त रितेश 'हाउसफुल 4' मध्ये दिसेल. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा सोबत 'मरजावां' चित्रपटातही तो काम करणार आहे. हा चित्रपट 5 मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होईल. रितेश आणि निर्माता साजिद नाडियाडवाला एकत्रित काम केलेला 6 वा चित्रपट आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif