Drishyam 2: विजय पुन्हा आपल्या कुटुंबाला वाचवू शकेल का? ‘दृश्यम 2’च्या शूटला सुरुवात

फोटोमध्ये दोघेही शूटिंगच्या वेळी दिसत आहेत.

Drishyam 2 (Photo Credit - Twitter)

अजय देवगण (Ajay Devgan) स्टारर 'दृश्यम 2' (Drishyam 2) चे शूटिंग सुरु झाले आहे. अजय देवगणने स्वतः एक पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितले आहे. या बातमीने अजय देवगणचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत. ज्यांनी 'दृश्यम'चा (Drishyam) पहिला भाग पाहिला होता ते या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत होते. अशा परिस्थितीत अजय देवगणने (Drishyam Shooting Start) या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत (Mumbai) सुरू केले आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग येत्या काही दिवसांत गोव्यात (Goa) होणार आहे. दृष्यमच्या पहिल्या भागात अजय देवगण व्यतिरिक्त तब्बू, (Tabbu) श्रिया सरन (Shreya Sarin) आणि इशिता दत्ता (Ishita Dutta) आदी अभिनेत्री होत्या.

अजय देवगणने सेटवरील एक फोटो केला शेअर 

अजय देवगणच्या या क्राईम-थ्रिलर जॉनर चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो देखील समोर आले आहे, ज्यामध्ये अजय देवगण आणि श्रेया सरन देखील दिसत आहेत. फोटोमध्ये दोघेही शूटिंगच्या वेळी दिसत आहेत. अजय देवगणने स्वतः हा फोटो शेअर करत लिहिले- 'विजय पुन्हा आपल्या कुटुंबाला वाचवू शकेल का? दृश्यम 2 चे शूटिंग पुन्हा सुरू झाले.

Tweet

चित्रपटातील तेच कलाकार पाहायला मिळणार, कथेत येणार नवा ट्विस्ट!

यावेळीही तीच कास्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पहिल्या दृश्यमच्या तुलनेत दृष्यम 2 मध्ये बरेच काही वेगळे असणार आहे. यावेळी पहिल्या चित्रपटाच्या घटनेनंतर 7 वर्षांनी कथा सुरू होणार आहे, आणि विजय आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धावपळ सुरू होणार आहे. यावेळी विजय आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी किती मजल मारणार हे जाणून घेणं खूप रंजक असणार आहे. (हे ही वाचा Vaani Kapoor ने नुकताच एक Hot फोटो केला पोस्ट, अभिनेत्रीची Bold अदा पाहून चाहते चकित)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण म्हणाला- 'दृश्यमला याआधीही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. आता दृष्यम 2 सोबत मी आणखी एक मनोरंजक कथा सादर करणार आहे, मी आणि माझी टीम याबद्दल खूप उत्सुक आहोत. विजय हे बहुआयामी पात्र आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक निर्मित 'दृश्यम 2' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आधीच्या कथेनंतर आता या कथेतही मोठे आणि मनोरंजक ट्विस्ट येणार आहेत.