आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री दिशा पटानी ने शेअर केला 'हा' खास फोटो, हटके स्टाईलने दिल्या शुभेच्छा
या पोस्ट खाली दिशा ने 'हॅप्पी बर्थ डे आदित्य ठाकरे' असे म्हटले आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवर आदित्य यांना टॅग सुद्धा केले आहे.
महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तसेच कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाकडून तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शुभेच्छांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिने खास आदित्य ठाकरे यांच्या सोबतचा फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो दिशा ने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांची मैत्री प्रचंड चर्चेत आहे.
या फोटोमध्ये दिशा आणि आदित्यसोबत गायक सिद्धार्थ महादेवन (Siddharth Mahadevan) सुद्धा आहेत. या पोस्ट खाली दिशा ने 'हॅप्पी बर्थ डे आदित्य ठाकरे' असे म्हटले आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवर आदित्य यांना टॅग सुद्धा केले आहे.
आदित्य ठाकरे यांना त्यांचे जवळचे मित्र रितेश देशमुख याने देखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आदित्य ठाकरे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या भावा, तुला खूप शक्ती मिळो आणि तू याच प्रकारे चांगले काम करत राहा. तुम्हाला उत्तम स्वास्थ्य, आनंद आणि प्रेम मिळो."