मुंबई विमानतळावर अभिनेत्री Juhi Chawla चे हरवले Diamond Earring; सोशल मिडियाद्वारे केले मदतीचे आवाहन, शोधून देणाऱ्यास मिळेल बक्षीस

आपणास वाटेल की ही मोठी गोष्ट नाही, परंतु कदाचित हा फक्त एक दागिना नसून त्यामध्ये जुहीच्या भावना अडकल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येते

Juhi Chawla (Photo Credits: Instagram)

कधी कधी आपणाकडून गडबडीमध्ये, घाईत असताना गोष्टी हरवतात. या गोष्टी थोड्या महागड्या असल्या तर नक्कीच वाईट वाटते, मात्र या गोष्टी मौल्यवान असल्या आपण मनापासून दुःखी होतो व ती हरवलेली गोष्ट परत मिळवण्यासाठी जितके करता येतील तितके प्रयत्न करतो. आता अशीच अवस्था झाली आहे अभिनेत्री जुही चावलाची (Juhi Chawla). तर जुही चावलाचे मौल्यवान असे डायमंडचे कानातले (Diamond Earring) हरवले आहे व आता ते शोधण्यासाठी तिने सोशल मिडियावर लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. याबाबत तिने एक पोस्ट लिहिली असून त्यामध्ये तिने कानातल्या जोडीच्या दुसऱ्या इयररिंगचा फोटोही शेअर केला आहे.

ट्वीटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये जुही लिहिते, ‘आज सकाळी मी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमिराती येथे चेक इन करण्यासाठी टी 2, गेट 8 च्या दिशेने ड्राईव्हवेवर प्रणाम बग्गीमध्ये चालत असताना कुठेतरी माझे हिऱ्याचे  कानातले पडले. जर कोणी हे शोधण्यासाठी मला मदत करू शकले तर मला खूप आनंद होईल. याबाबत कृपया पोलिसांना कळवा व त्याबाबत तुम्हाला बक्षीस द्यायला मला नक्कीच आवडेल. हरवलेल्या इयररिंगच्या जोडीचा हा दुसरा पीस मी शेअर करत आहे. गेली 15 वर्षांपासून जवळजवळ दररोज मी ही इयररिंग्ज घालत आहे. कृपया मला ते शोधण्यात मदत करा. धन्यवाद.’

अशाप्रकारे जुही चावला खरोखरच सोशल मीडियाद्वारे चमत्कारची अपेक्षा करत आहे. आपणास वाटेल की ही मोठी गोष्ट नाही, परंतु कदाचित हा फक्त एक दागिना नसून त्यामध्ये जुहीच्या भावना अडकल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. (हेही वाचा: Sonu Sood To Gift E-Rickshaws: गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूदची नवी योजना; स्वावलंबी बनण्यासाठी मोफत देणार ई-रिक्षा)

याआधी, किम कर्दशियनचे हिऱ्याचे कानातले समुद्रामध्ये हरवले होते. त्यावेळी ती प्रचंड रडली होती. तिचा रडगाणे पाहून तिची बहीण कोर्टनी म्हणाली होती की, 'असे कित्येक लोक समुद्रात मारतात, तू कानातल्याचे काय घेऊन बसली.' तिचे हे वाक्य मीम बनले होते. परंतु, विनोदाचा भाग वगळता आपण कधीकधी भौतिक वस्तूंच्यामागील भावनिक मूल्य समजण्यास अयशस्वी ठरतो. त्यामुळे आम्ही आशा करतो की जुहीला तिचे कानातले सापडावे.