Deepika Padukone ने नववर्षाच्या पूर्वसंध्येला चाहत्यांना दिला मोठा धक्का! Instagram, Facebook, Twitter अकाउंटवरील वरील सर्व पोस्ट केले Delete

सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली दीपिका आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र त्यात अचानक तिने सर्व पोस्ट डिलीट केल्यामुळे चाहतेही संभ्रमात पडले आहे.

Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने नववर्षाच्या पूर्वसंध्येला चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आपल्या लोकप्रियतेमुळे आणि गॉसिप्समुळे नेहमीच चर्चेत असलेल्या दीपिकाने आपले सोशल अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केले आहेत. ऐकून धक्का बसला ना! पण हे खरे आहे. दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) आणि फेसबुक (Facebook) अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केले आहे. हे करण्यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समजू शकले नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही घडलंय की तिचे अकाउंट कोणी हॅक केलय की आणखी काही असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहे.

दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटवरील एकही पोस्ट दिसत नाही आहे. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली दीपिका आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र त्यात अचानक तिने सर्व पोस्ट डिलीट केल्यामुळे चाहतेही संभ्रमात पडले आहे.हेदेखील वाचा- Ranbir Kapoor आणि Alia Bhatt यांचा होत आहे साखरपुडा? रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा 

Deepika Padukone Instagram (Photo Credits: Instagram)

असं करण्यामागे तिचे आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंह यांच्यात काही बिनसलं तर नाही ना अशी शंका मनात येत असेल तर तसेही काही नाही. कारण रणवीरचे सोशल मिडिया इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट अॅक्टिव असून त्यात सर्व पोस्ट दिसत आहे. मात्र दीपिकाचे हे करण्यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

एकीकडे नववर्षाच्या पूर्वसंध्येचे जंगी सेलिब्रेशन सर्वजण आपल्या सोशल अकाउंटवर पोस्ट करत असताना दीपिकाचे एकाएकी सर्व पोस्ट डिलिट करणे चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे हा पब्लिसिटी स्टंट आहे की कोणत्या नव्या प्रोजेक्टचे प्रमोशन हे कारण देखील अस्पष्ट आहे. त्यामुळे सर्वजण नववर्षाची वाट पाहत आहे जेणेकरून दीपिकाचा यावरील पडदा उठवून असे करण्यामागचे खरे कारण सांगेल.