DDLJ Returns in Maratha Mandir: शाहरुख खान-काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' पुन्हा एकदा मराठा मंदिरात दाखल, आजपासून सुरु झाले स्क्रीनिंग
आता महाराष्ट्र सरकारने अनलॉक 5 च्या टप्प्यात सिनेमागृहे 50% क्षमतेने सुरु केली आहेत. त्यामुळे मराठा मंदिरात DDLJ हा चित्रपट देखील पुन्हा पाहायला मिळणार आहे.
90 च्या दशकात जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) आता पुन्हा एकदा मुंबईच्या मराठा मंदिर (Maratha Mandir) सिनेमागृहात दाखल झाला आहे. गेली 25 वर्षे हा चित्रपट मराठा मंदिरात दाखवला जात आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि काजोल (Kajol) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) सर्व रेकॉर्ड तोडले होते. राज आणि सिमरन ची गोड लव्हस्टोरी घेऊन आलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. लॉकडाऊन मध्ये सर्व सिनेमागृहे बंद होती. मात्र आता महाराष्ट्र सरकारने अनलॉक 5 च्या टप्प्यात सिनेमागृहे 50% क्षमतेने सुरु केली आहेत. त्यामुळे मराठा मंदिरात DDLJ हा चित्रपट देखील पुन्हा पाहायला मिळणार आहे.
शाहरुख आणि काजोलच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून फिल्म समीक्षक तरण आदर्शने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यशराज बॅनरची 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. DDLJ ही आदित्य चोपड़ा यांचा आयकॉनिक सिनेमा आहे. जो दीर्घकाळ सिनेमागृहात आपली जादू पसरवत राहिला. या चित्रपटाला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली. हेदेखील वाचा- Burj Khalifa Honours Shah Rukh Khan: शाहरुख खान ला वाढदिवसाच्या दिवशी बुर्ज खलिफाकडून मिळाला 'हा' मोठा सन्मान; पहा व्हिडिओ
त्यात आता हा चित्रपट पुन्हा एकदा तुम्हाला मोठ्या स्क्रिनवर पाहायला मिळणार असल्याने चाहते देखील आनंदात आहे. तरण आदर्श ने 'आदित्य चोपड़ा यांचा आयकॉनिक चित्रपट 6 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून मराठा मंदिरात दाखल झाली आहे.' असे लिहिले आहे.
या चित्रपटासह या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसेच काजोल शाहरुख सह अमरीश पुरी, अनुपम खेर, फरिदा जलाल यांच्या भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)