Cyclone Nisarga च्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि ईशा गुप्ता यांचे चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन
निसर्ग चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत आहे. या वादळाचा धोका महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. तसंच आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असून NDRF च्या टीम्स देखील तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, घराबाहेर पडू नये, असे आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड सेलिब्रेटींनी चाहत्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि ईशा गुप्ता (Esha Gupta) यांनी सोशल मीडिया माध्यमातून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. (निसर्ग चक्रीवादळाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
अक्षय कुमार व्हिडिओ:
Shilpa Shetty Post:
Esha Gupta Appeal:
निसर्ग चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी NDRF च्या 34 टीम्स विविध ठिकाणी सज्ज आहेत. यापैकी 16 गुजरात, 15 महाराष्ट्र तर दोन दमणमध्ये आणि एक दादरा नगर हवेलीत तैनात करण्यात आल्या आहेत. तर मुंबईत कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.