सुप्रसिद्ध संगीत कंपनी T-Series मध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मुंबई महापालिकेने केली संपूर्ण बिल्डिंग सील

देशातील सुप्रसिद्ध कंपनी T-Series मध्ये कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19) रुग्ण आढळल्यामुळे ही संपूर्ण बिल्डिंग सील करण्यात आली आहे.

Bhushan Kumar (Photo Credits: Instagram)

देशातील सुप्रसिद्ध कंपनी T-Series मध्ये कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19) रुग्ण आढळल्यामुळे ही संपूर्ण बिल्डिंग सील करण्यात आली आहे. या घटनेमुळे या कंपनीमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. या बातमीची माहिती मिळताच मुंबई महापालिकेने (BMC) ही संपूर्ण बिल्डिंग सील केली आहे. सांगितले जात आहे की, या बिल्डिंगच्या केअर टेकरला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या कंपनीत हा पहिलाच कोरोना रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, या कंपनीच्या तळमजल्यावर असणा-या एका कर्मचारीला कोरोनाची लागण झाली. ही घटना टी सिरिजच्या मुंबईतील अंधेरीच्या कंपनीमध्ये घडली आहे. सांगण्यात येत आहे की, 15 मार्चपासून ऑफिसचे कामकाज बंद करण्यात आले होते. मात्र यातील काही कर्मचारी आपल्या घरी परत जाऊ शकले नाही. Coronavirus in India: भारतात कोणत्या राज्यात किती आहे कोरोना संक्रमित रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

 

View this post on Instagram

 

Every song takes you on a journey... Being a part of so many of them with the talented bunch of people at @tseries.official is a blessing! #BehindTheMusic

A post shared by Bhushan Kumar (@bhushankumar) on

यामुळे कंपनीने या कर्मचा-यांची ऑफिसमध्येच खाण्यापिण्याची व्यवस्था केली. मात्र यातील एकाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर येथील इतर कर्मचा-यांची कोरोना टेस्ट सुद्धा करण्यात आली. यातील अनेकांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. गुलशन कुमार यांच्या नंतर त्यांचा मुलगा भूषण कुमार ही कंपनी सांभाळत आहे.