Coronavirus Outbreak: अमेरिकेतून मास्क घालून परतले अभिनेते अनुपम खेर; खबरदारी म्हणून घेतला Self Isolation चा निर्णय

त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Anupam Kher (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) शुक्रवार (20 मार्च) रोजी अमेरिकेतून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी आयसोलेशनमध्ये (Isolation) जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सेल्फ आयसोलेशनमुळे (Self Isolation) स्वतःबरोबरच इतरांची सुरक्षा देखील सुनिश्चित होते. अनुमप खेर भारतात परतल्यानंतर त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. मात्र त्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना अनुमप खेर यांनी सांगितले की, "मी अमेरिकेहून परतलो असून विमानतळावर माझी तपासणी करण्यात आली. मात्र त्यात कोरोनाचे निदान झाले नाही. त्यामुळे मला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तरी देखील मी घरातच आयसोलेशनमध्ये राहणार आहे."

अनुपम खेर अमेरिकेतील न्युयॉर्क शहरातील एम्स्टर्डम मध्ये एका टीव्ही सिरीजचे शूटिंग करत होते. मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आले आणि अनुपम भारतात परतले. (Coronavirus पासून सुरक्षित राहण्यासाठी अभिनेते दिलीप कुमार देखील Self Quarantine मध्ये! ट्वीट करत दिला चाहत्यांना 'हा' सल्ला!)

अनुपम खेर (Photo Credits: Yogen Shah)

या शो बद्दल अनुपम खेर यांनी सांगितले की, "हा एपिसोडिक शो असून याचे 22 एपिसोड आहेत. मात्र 19 वा एपिसोड हा याचा शेवटचा एपिसोड असेल. कारण कोरोना व्हायरसमुळे आम्ही पुढील एपिसोड शूट करु शकलो नाही. कोरोनाच्या दहशतीमुळे सारं काही बंद करण्यात आलं आहे."

अनुपम खेर यांचे सहकलाकार डेनियल डे किम (Daniel Dae Kim) यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. यावर अनुपम खेर विचारले असता मी त्यांच्यासोबत अजून काम केले नसून याबद्दल मला काही माहित नाही, असे त्यांनी सांगितले.