आपल्याला ट्रोल करणा-यांना Amaal Mallik ने दिले सडेतोड उत्तर; ज्येष्ठ गायक अनू मलिकांविषयी केले 'हे' मोठे विधान
सगळीकडे तूच मोठ असं समजू नकोस. प्रसिद्धीची हवा तुझ्या डोक्यात शिरली आहे' असे म्हणणा-या ट्रोलरला अमाल ने सडेतोड उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक अनू मलिक (Anu Malik) यांच्यावर टिका करणारा संगीतकार अमाल मलिक (Amaal Mallik) चांगलाच ट्रोल होऊ लागला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सुरु झालेला नेपोटिजम वादात अमालने उडी घेत संगीत क्षेत्रातील नेपोटिजम वादावर भाष्य केले. यामध्ये त्याने अनू मलिका यांच्यावर टिका केली होती. त्याचबरोबर Me Too मध्येही त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर अमाल ट्रोल होऊ लागला. ज्येष्ठ संगीतकारांचा आदर करायला शिक असे म्हणणा-या एका ट्रोलरला अमाल जबरदस्त उत्तर दिले आहे. मुख्य म्हणजे या उत्तरातही त्याने अनू मलिकविषयी मोठे विधान केले आहे.
'आपल्या वरिष्ठांचा आदर ठेवायला शिक. सगळीकडे तूच मोठ असं समजू नकोस. प्रसिद्धीची हवा तुझ्या डोक्यात शिरली आहे' असे म्हणणा-या ट्रोलरला अमाल ने सडेतोड उत्तर दिले आहे.
'अनू मलिक दिग्गज संगीतकार आहे. मात्र माणूस म्हणून ते कसे आहेत हे त्या महिलांना जाऊन विचार ज्यांचे त्यांनी लैंगिक शोषण केले. माणसाचे काम आणि माणसाची वागणूक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काम चांगले आहे याचा अर्थ माणूस चांगला असे नाही' अशा शब्दांत आपल्या ट्रोलरला उत्तर देत पुन्हा अनू मलिकांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान नेपोटिजम बाबत रंगलेला वाद आता संगीत क्षेत्रातही असल्याचे पाहायला मिळत आहे. सोनू निगमसह अमाल मलिकने ही याबाबत वक्तव्य केले होते.