XXX स्टार मिया मालकोवा हिच्या क्लायमेक्स चित्रपटाच्या बोल्ड ट्रेलरने इंटरनेटवर लावली आग; 24 तासात साढे तीन लाख लोकांनी पाहिला

गेले प्रदीर्घ काळ हा चित्रपट लोकांमध्ये चर्चा आणि उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्यात मिया मालकोवा हिच्या चित्रपटातील कामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण हा ट्रेलर इतका बोल्ड आहे की. यात मिया जवळपास टॉपलेस अवतारात दिसते.

XXX स्टार मिया मालकोवा हिच्या क्लायमेक्स चित्रपटाच्या बोल्ड ट्रेलरने इंटरनेटवर लावली आग; 24 तासात साढे तीन लाख लोकांनी पाहिला
Mia Malkova | (Image Credit: YouTube)

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांच्या क्लायमॅक्स (Climax) चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवर रिलीज झाला आणि तो पाहण्यासाठी युजर्सच्या उड्या पडल्या. इतक्या की हा ट्रेलर युट्युबवर अपलोड केल्यापासून आतापर्यंत सुमारे तीन लाखांहून अधिक यूजर्सनी पाहिला आहे. 18 मे रोजी अपलोड झालेला हा ट्रेलर 19 मे 2020 सकाळी 10.15 पर्यंत 356,397 व्ह्युवर्सनी पाहिला. हा आकडा अद्यापही वाढतोच आहे. चित्रपट नेमका कसा आहे. त्यातील अभीनय, संगीत, दिग्दर्शन कसे झाले आहे. याबाबत उत्सुकता आहेच. पण, त्याहीपेक्षा ट्रेलर अधिक चर्चेत आहे तो म्हणचे त्यातील बोल्डनेमुळे. XXX स्टार मिया मालकोवा (Mia Malkova) या चित्रपटात काम करते आहे.

गेले प्रदीर्घ काळ हा चित्रपट लोकांमध्ये चर्चा आणि उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्यात मिया मालकोवा हिच्या चित्रपटातील कामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण हा ट्रेलर इतका बोल्ड आहे की. यात मिया जवळपास टॉपलेस अवतारात दिसते. या आधीही मिया अंगप्रदर्शन करताना दिसली आहे. क्लायमॅक्स चित्रपटाचा हा ट्रेलर साधारण 2 मिनिटांचा आहे.

मिया मालकोवा (Mia Malkova) हिने आणि रामगोपाल वर्मा यांनी या आधीही या चित्रपटात काम केले आहे. या आधी मिया आणि रामगोपाल वर्मा,गॉड, सेक्स और ट्रुथमध्ये एकत्र काम करताना दिसले आहेत. त्यानंतर आता हे क्लायमॅक्स चित्रपटात एकत्र आले आहेत. कोरोना व्हायरस संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. सर्व थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे हा चित्रपट नेमका कधी रिलीज होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, ट्रेलर उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. (हेही वाचा, Film Climax Bold Trailer Release: राम गोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट Climax चा ट्रेलर रिलीज, XXX स्टार मिया मालकोवा हिचे अंगप्रदर्शन चर्चेचा विषय)

क्लायमॅक्स ट्रेलर

रामगोपाल वर्मा दिग्दर्शित क्लायमॅक्सच्या ट्रेलरमध्ये सस्पेंस आणि बोल्डनेस खचाखच भरलेला पाहायला मिळतो. ट्रेलरमध्ये मिया आपल्या पार्टनरसोबत रेगिस्तान ट्रिप मध्ये पाहायला मिळते. दोघेही एखाद्या रोमॅंटीक जर्नीवर असल्याचे पाहायला मिळते. ट्रीपदरम्यान काही घटना अशा घडतात ज्याची या दोघांना कल्पना नसते. रामगोपाल वर्मा आणि मिया मालकोवा यांचे चाहते या चित्रपटास कसा प्रतिसाद देतात हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच करणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2020 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).