Poonam Pandey Fake Death Claim Case: पूनम पांडेविरुद्ध सिने कामगार संघटनेची FIR ची मागणी; AICWA ने विक्रोळीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लिहिले पत्र

AICWA निवेदनात पुढे म्हटलं आहे की, 'पूनम पांडेच्या व्यवस्थापकाने खोट्या बातम्यांची पुष्टी केली होती, त्यामुळे वैयक्तिक फायद्यासाठी (पीआर) कोणीही त्यांच्या स्वत: च्या मृत्यूच्या बातम्यांचा गैरफायदा घेऊ नये म्हणून पूनम पांडे आणि तिच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर नोंदवावा.'

Poonam Pandey (PC - Instagram)

Poonam Pandey Fake Death Claim Case: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाल्याच्या बातमीनंतर आज अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) ने आपण जिवंत असल्याचं सांगितलं आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्रीच्या या कृत्याचा संताप व्यक्त केला आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (All Indian Cine Workers Association AICWA) ने शनिवारी पूनम पांडेविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

पूनम पांडेने शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिने दावा केला आहे की, तिने गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागृतता पसरवण्यासाठी तिच्या मृत्यूचा बनाव केला होता. आता AICWA ने शनिवारी X वर अभिनेत्रीचे हे कृत्य 'अत्यंत चुकीचे' असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा -Poonam Pandey is ALIVE: पूनम पांडे जिवंत; गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाकडे लक्ष वेधण्यासाठी दिली मृत्यूची खोटी माहिती (Watch Video))

AICWA ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा फेक पीआर स्टंट अत्यंत चुकीचा आहे. स्वत: ची जाहिरात करण्यासाठी गर्भाशयाच्या कर्करोगाचा आधार घेणे मान्य नाही. या बातमीनंतर, लोक भारतीय चित्रपटातील मृत्यूच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यास संकोच करू शकतात. उद्योग चित्रपटसृष्टीतील कोणीही जनसंपर्कासाठी इतक्या थराला जात नाही.'

त्यानंतर एआयसीडब्ल्यूएने पूनम आणि तिच्या मॅनेजरवर एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. AICWA निवेदनात पुढे म्हटलं आहे की, 'पूनम पांडेच्या व्यवस्थापकाने खोट्या बातम्यांची पुष्टी केली होती, त्यामुळे वैयक्तिक फायद्यासाठी (पीआर) कोणीही त्यांच्या स्वत: च्या मृत्यूच्या बातम्यांचा गैरफायदा घेऊ नये म्हणून पूनम पांडे आणि तिच्या व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर नोंदवावा.'